आता प्रत्येक घर हाेणार ‘सॅनिटाइज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:24+5:302021-09-09T04:13:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यावर उपाययोजना म्हणून शहरातील प्रत्येक घर ‘सॅनिटाइज’ करण्यात येणार आहे. ...

Every house will now be 'sanitized' | आता प्रत्येक घर हाेणार ‘सॅनिटाइज’

आता प्रत्येक घर हाेणार ‘सॅनिटाइज’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यावर उपाययोजना म्हणून शहरातील प्रत्येक घर ‘सॅनिटाइज’ करण्यात येणार आहे. सोबतच कोरोनाबाबतची इंत्थंभूत माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार असून, यासाठी स्टुडंट वेलफेअर असोसिएशन उमरेडच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ उमरेडपासून करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधीर पारवे होते. यावेळी पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर फलके, दिलीप सोनटक्के, नगरसेविका अरुणा हजारे, जयसिंग गेडाम, विशाल देशमुख, अजय कोवे, श्रीकृष्ण जुगनाके, शैलेश तिवारी, प्रकल्प जिल्हा समन्वयक डॉ.कृष्णा कारू, करुणा कारू, अरविंद हजारे, उमेश वाघमारे, सुनील चिचघरे, विद्याधर तारणेकर, शिवानंद सहारकर, मनिष बारापात्रे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कारू यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन सोनकुसरे यांनी केले. आभार रमेश संत यांनी मानले. या उपक्रमासाठी दिलीप गोविंदानी, श्रीकांत बन्सोड, प्राची घुगल, अश्याक अन्सारी, क्षितिज कारू, अरविंद नंदनवार, योगेश सुभेदार, हितेश नंदनवार, उत्तम तारणेकर, मृणाल सहारकर, मनिष शिंदेकर, ईश्वर इटनकर, जितेंद्र भिसीकर, दत्तू सोनकुसरे, गणेश आमगावकर, विनोद धकाते आदींनी सहकार्य केले.

Web Title: Every house will now be 'sanitized'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.