नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 03:13 PM2021-02-20T15:13:10+5:302021-02-20T15:16:48+5:30

Nagpur News येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे.

Every school in Nagpur district will be inspected | नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची होणार तपासणी

नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची होणार तपासणी

Next
ठळक मुद्दे३०० अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्तीसंक्रमण वाढलेल्या शाळेचा घेणार आढावा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात ५ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पण सावनेर, नरखेड, रामटेक तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थी कोरोनामुळे संक्रमित झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही बाब गांभिर्याने घेतली असून, येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस शाळांना अचानक भेटी द्यायच्या आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाद्वारे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्व तयारी करण्याचे निर्देश दिले होते. पूर्व तयारीचे नियोजन योग्य झाले की नाही, त्यासाठी अधिकाऱ्यांकडून शाळा भेटी करवून घेण्यात आल्या होत्या. नंतर अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी हळुहळु कमी झाल्या. मात्र गेल्या तीन ते चार दिवसात जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अलर्ट झाले.

ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संक्रमित झाले, त्या शाळांमध्ये कोरोना प्रादूर्भावाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि एकुणच कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन होतेय की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जवळपास ३०० अधिकारी हे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला भेटी घेऊन त्याचा आढावा घेणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता नेमुन दिलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्येक तहसिल कार्यालयात उपस्थित राहायचे आहे. तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

- याकडे राहणार कटाक्ष

तपासणीत कोविड सदृष्य लक्षण असलेले शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची आरटीपीसीआर चाचणी झाली का?, शाळेतील स्वच्छता व निर्जंतूकीकरण विषयक सुविधेची निश्चिती, उपलब्ध वर्गखोल्यांमधील बैठकीची व्यवस्था, शारीरीक अंतराचे पालन आदी तपासण्यात येणार आहे. पालक अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन वेळा अचानक तपासणी करावयाची आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल द्यायचा आहे.

Web Title: Every school in Nagpur district will be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.