लग्नात सहभागी सर्वांची होणार कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:12+5:302021-05-09T04:08:12+5:30

स्वीपर कॉलनी येथील लग्नसमारंभात २०० नागरिक सहभागी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील स्वीपर कॉलनी ...

Everyone attending the wedding will have a corona test | लग्नात सहभागी सर्वांची होणार कोरोना टेस्ट

लग्नात सहभागी सर्वांची होणार कोरोना टेस्ट

Next

स्वीपर कॉलनी येथील लग्नसमारंभात २०० नागरिक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील स्वीपर कॉलनी येथील रहिवासी राजेश समुंद्रे यांच्याकडे बुधवारी लग्नसमारंभ होता. यासाठी १५० ते २०० नातेवाइकांची गर्दी जमवल्याने त्यांना मनपाच्या एनडीएस पथकाने ५० हजार रुपये दंड आकारला होता. गर्दीमुळे संक्रमणाचा धोका असल्याने या लग्न समारंभात सहभागी झालेल्या वर-वधुपक्षाकडील सर्वांची सोमवारी कोरोना चाचणी केली जाणार आहे. यासाठी मनपाच्या कोरोना टेस्टींग मोबाईल लॅबद्वारे अ‍ॅन्टिजेन व आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी राजेश समुद्रे यांना पत्र दिले असून, लग्नात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

....

Web Title: Everyone attending the wedding will have a corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.