प्रत्येकांनी लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:39+5:302021-07-15T04:07:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संशाेधकांनी वर्षभर संशाेधन करीत काेराेनाला राेखण्यासाठी लस तयार केली आहे. ही ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संशाेधकांनी वर्षभर संशाेधन करीत काेराेनाला राेखण्यासाठी लस तयार केली आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन कामठी न्यायालयाचे कनिष्ठ दिवाणी न्या. दीपक भाेला यांनी केले.
प्रभाग १५ गाैतम नगरातील नगर परिषद शाळेत लसीकरण शिबिराचे आयाेजन करण्यात आले. न्या. दीपक भाेला यांनी लसीचा पहिला डाेस टाेचून घेत शिबिराला सुरुवात झाली. संभाव्य काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता काेराेनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता नागरिकांनी लस टाेचून घ्यावी, असेही न्या. भाेला यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका संध्या रायबाेले, न. प. मुख्य लिपिक आबासाे मुंढे, मुख्याध्यापक जाहीद अली उपस्थित हाेते.
या शिबिरात १८ ते ४४ वयाेगटातील ५० नागरिकांनी, ४५ ते ६० वयाेगटातील ३८ जणांनी लसीचा पहिला डाेस घेतला तर ६८ जणांना दुसरा डाेस असे एकूण १५६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शिबिराच्या आयाेजनासाठी स्विटी रामटेके, विक्की बाेंबले, अरविंद चवडे, कमलाकर पेंढे, प्रज्वल साेळंकी, अजित साेनकुसरे, अभिषेक कनाेजे, राेशन दमाहे, आदित्य जगणित, सतीश जयस्वाल, मनाेज नारनवरे, जगदीश पुंड, तहसीन अली आदींनी सहकार्य केले.