दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:11 AM2020-12-05T04:11:54+5:302020-12-05T04:11:54+5:30
नागपूर : दिव्यांगांवर विविध प्रयोगातून, उपचारातून मात करता येते. दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश फुलवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने एक पाऊल समोर यावे ...
नागपूर : दिव्यांगांवर विविध प्रयोगातून, उपचारातून मात करता येते. दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश फुलवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने एक पाऊल समोर यावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी केले. नागपूर येथील शासकीय अपंग बहुउद्देशीय संमिश्र केंद्रात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल किटे, मिलिंद वानखेडे, प्रल्हाद लांडे, डॉ. राकेश येवले, खिमेश बढिये, प्रमिला साठवणे, आनंद पाटील, सुरेश माळोदे, प्रशांत वाढिवे, सचिन रामटेके उपस्थित होते. राज्यातील पहिला प्रयोग म्हणून अपंग संमिश्र केंद्रात ‘पूर्वनिदान उपचार केंद्राचे’ उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी अन्नपूर्णा शेंडे, रूपेश सवाईमूल, संतोष फड, नागेश कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.