प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करावा

By Admin | Published: December 28, 2014 12:40 AM2014-12-28T00:40:57+5:302014-12-28T00:40:57+5:30

संत नामदेवांनी कुत्र्याने चपाती नेल्यामुळे त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले. संत एकनाथांनी गाढवाला तहान लागल्यामुळे आपल्या कावडीतील पाणी दिले. प्रत्येक प्राण्यात ईश्वराने दिलेला

Everyone should try to pay off the debt | प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करावा

प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करावा

googlenewsNext

सुधीर मुनगंटीवार : बहार बाविस्करांना लक्ष्मीकांत हरकरे स्मृती पुरस्कार प्रदान
नागपूर : संत नामदेवांनी कुत्र्याने चपाती नेल्यामुळे त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले. संत एकनाथांनी गाढवाला तहान लागल्यामुळे आपल्या कावडीतील पाणी दिले. प्रत्येक प्राण्यात ईश्वराने दिलेला जीव वास करतो. त्यामुळे प्रत्येकाने प्राण्यांसाठी काहीतरी करून समाजऋण फेडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
वनराई फाऊंडेशनच्यावतीने स्व. लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कार २०१४ ‘वाईल्ड सीईआर’ संस्थेचे संस्थापक डॉ. बहार बाविस्कर यांना शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुल सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाठक, डॉ. पिनाक दंदे, सत्कारमूर्ती डॉ. बहार बाविस्कर, नितीन जतकर, अनिल राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, समाजात चांगुलपणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक प्राण्याला योग्य आहार घेण्याचा आणि जिवंत राहण्याचा अधिकार आहे. वनराईतर्फे समाजाला दिशा देण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. गिरीश गांधी यांनी वन्य जीवांच्या संरक्षणासाठी लक्ष्मीकांत ऊर्फ राजू हरकरे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. पुरस्काराचा हा पाचवा कार्यक्रम असून वन्य प्राण्यांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाठक यांनी समाजात चांगल्या कामाची ओळख करून देणाऱ्या संस्था उरल्या नसल्याची खंत व्यक्त केली. आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती डॉ. बहार बाविस्कर यांनी आपल्या वाटचालीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. लक्ष्मीकांत ऊर्फ राजू हरकरेंसोबत केलेल्या कामाची माहिती त्यांनी देऊन जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करण्याविषयी समाजात, वनविभागात उदासीनता असल्याचे मत व्यक्त केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. आभार स्वानंद सोनी यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Everyone should try to pay off the debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.