सर्वत्र ‘जयभीम’चा निनाद

By admin | Published: April 16, 2016 02:39 AM2016-04-16T02:39:17+5:302016-04-16T02:39:17+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

Everywhere 'Jayabhiyam' is condemned | सर्वत्र ‘जयभीम’चा निनाद

सर्वत्र ‘जयभीम’चा निनाद

Next


बाबासाहेबांना हजारो अनुयायांनी केले अभिवादन : विविध संस्था, संघटनांतर्फे आयोजन
नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांसह आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी व संविधान चौक येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. एकूणच जय भीमच्या घोषणांनी आसमंत निनादला होता.

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ
संघटनेच्या प्रशासनिक शाखेतर्फे कॅरेज अँड वॅगन विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रशासनिक शाखेचे प्रमुख बिपीन पाटील, विभागीय सचिव देबाशिष भट्टाचार्य, जी. एम. शर्मा उपस्थित होते. संचालन युजिन जोसेफ यांनी केले. यशस्वितेसाठी बाबू बिंद्रायण, ए. के. गुप्ता, वैभव आळणे, सरोज गायकवाड, विजय वाघमारे, पुरुषोत्तम वानखेडे, यशवंत मते, आशिष नांदगावे, सुशील पसेरकर, श्याम गौर, रिना सुटे, प्रियंका स्वामी, बंसमणी शुक्ला, प्रमोद खिरोडकर यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र बिल्डींग कन्स्ट्रक्शन फॉरेस्ट
अ‍ॅण्ड वूड वर्कर्स युनियन
संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सीताबर्डी येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी राजेंद्र रामटेके, दादाराव डोंगरे, रामगोविंद खोब्रागडे, अरुणा रामटेके, प्रकाश डेहनकर, ऐश्वर्या देशपांडे, विनिता तिवारी, अतुल आवळे, चेतन लांबाडे, सुशिल डोंगरे, रोहित झा, नितेश शेंडे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय
महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रमण चिमूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील गायकवाड, विजय सहारे, विष्णु पानतावणे, सचिन आग्र, रामचंद्र गोपनारायणे उपस्थित होते. संचालन प्रशांत परिपवार यांनी केले. आभार आकाश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला अरुण वाठ, कुणाल खैरकर, विद्युत वाघमारे, प्रभाकर लांडगे, विनोद कुसराम, अखिल पारलेवार, गोपाल चंगानी, अ‍ॅड सचिन शेंडे उपस्थित होते.

अखिल भारतीय धम्मसेना
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला भिक्खू संघाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण पंचशील तसेच बुद्ध वंदना सादर केली. यनंतर केक कापून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मिहान इंडिया प्रभारी वरिष्ठ विमानतळ निदेशक आबीद रुही, विमानतळ निदेशक रोशन कांबळे, सल्लागार एस.व्ही. चहांदे, राहुल कराडे, रवी मेंढे, भंते नागघोष, भंते नागसेन, भंते नागधम्म, भंते धम्मविजय, नागानंद, भंते धम्मानंद, भंते धम्मबोधी, भंते नागदीप, धम्मउदय, भंते धम्मकाया प्रामुख्याने उपस्थित होते.

कृपाल तुमाने
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अमित कातुरे, विवेक नवले, शेखर घटे, रोशन तितरमारे, सेहेल अहमद, स्वप्नील शिरपूरकर, रोशन ठाकरे, महेंद्र खराडे, किशोर तिजारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हेमंत गडकरी, उमेश बोरकर, महेश माने, रितेश जगतप, सुजित मधुमटके, सुचित खेर, शिवांस प्रजापती, भीमराव हाडके, राजकुमार मेश्राम, प्रकाश बोंद्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Everywhere 'Jayabhiyam' is condemned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.