Maharashtra Election 2019; विदर्भात अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स बिघडल्याच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 09:27 AM2019-10-21T09:27:58+5:302019-10-21T09:47:55+5:30
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांचा उत्साह ओसरल्याचेही दृश्य विदर्भात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांचा उत्साह ओसरल्याचेही दृश्य विदर्भात दिसून आले.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील नूतन प्राथमिक शाळेत असलेल्या २०४ क्रमांकाच्या मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन सकाळी ८ वाजल्यापासून बंद पडली आहे. या मशीनची बॅटी डाऊन असल्याचे सांगितले जाते. मतदारांनी बाहेर रांगा लावल्या असून, त्यांना दुसऱ्या मशीनच्या प्रतिक्षेत तिष्ठत रहावे लागते आहे. येथे आता दुसरी मशीन लावण्याची धडपड सुरू झाली आहे. दुसºया घटनेत भंडारा जिल्ह्यातील सीतेपर येथे मशीनमध्ये सकाळी ९ च्या सुमारास बिघाड झाला. येथेही नागरिक मतदानाच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे आहेत.
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव येथील पिंडकेपार येथे असलेल्या मतदान केंद्रात तीन नागरिकांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. येथे दुसºया मशीनच्या प्रतिक्षेत नागरिक रांगेत तिष्ठत आहेत. नागपुरात दाभा येथे जैस्वाल हायस्कुलमध्ये मशीन एक तास उशिरा सुरु झाली.
नागपुरात प्रतापनगर येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स या शाळेत आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर दहा मिनिटातच मशीन बंद पडली. त्याला सुरू करण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे लागली.
दुसºया एका घटनेत बोरगाव येथे असलेल्या बूथ क्र. ५१ मध्येही मशीन बंद पडली होती.