‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:17 AM2017-09-04T01:17:44+5:302017-09-04T01:18:00+5:30

ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत?

The 'EVM' aims to destroy democracy | ‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र

‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र

Next
ठळक मुद्देव्ही.एल. मातंग : बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्य अधिवेशनात टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत? त्याच्या अधिकारासाठी कोण लढले, हे त्याला चांगल्या पद्धतीने कळेल आणि आजवर आपल्याला धर्माच्या नावावर अंधपणे मत देत असलेला ओबीसी समाज उद्या मत देणार नाही. अशावेळी आपण सत्तेवर कसे येणार? या भीतीमुळेच सत्ताधाºयांनी इव्हीएम मशीन देशात आणली. इव्हीएम मशीन म्हणजे मताचा मिळालेला अधिकार हिरावणारी मशीन असून, या माध्यमातून लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र देशात सुरू आहे, अशी जाहीर टीका बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल. मातंग यांनी येथे केली.
बहुजन मुक्ती पार्टीचे दुसरे राज्य अधिवेशन रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने हे उद्घाटक होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ पाटील, विजय वाघचौरे, शिवाजी नाना पाटील, अनिलकुमार माने, प्रताप पाटील, आझाद लोंढे, रामनिवास गुप्ता, नंदा लोखंडे, यू.पी. राठोड, विजय राजूरकर, अ‍ॅड. अनिल किनाके व्यासपीठावर होते. व्ही. एल. मातंग म्हणाले, या देशात इव्हीएम मशीन आणण्याचे पाप हे काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे काँग्रेस इव्हीएमच्या विरोधात कधीच आवाज उचलताना दिसत नाही. भाजपाने या मशीनचा व्यापक वापर करून सत्ता स्थापित केली आहे. सध्याच्या सत्ताधाºयांनी इव्हीएमद्वारे मताचा अधिकारी हिरावला आहे, भूमी अधिग्रहणातून जमिनीचा अधिकार हिरावला आहे आणि नोटाबंदीद्वारे आता संपत्तीचाही अधिकार हिरावला आहे. याविरोधात जनआंदोलन उभारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संचालन महादेव जमदाडे यांनी केले. गणेश चौधरी यांनी आभार मानले.

बहुजन समाजाने एकत्र यावे - लक्ष्मण माने
सरकारच्या जमिनी लुटण्याचा धंदा आजही सुरू आहे. सर्वच समाज त्रस्त आहे. तेव्हा बहुजन समाजाने एकत्र येऊन जनआंदोलन उभारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले. जात-पोटजात विसरा, आंतरजातीय विवाह करा, असे आवाहन त्यांनी केले. पँथरपासून आपली सुरुवात झाली. आता बुद्धाकडे आलो आहे. आरएसएसला संपवण्यासाठी लढत राहणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: The 'EVM' aims to destroy democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.