आर्थिक मदतीसाठी माजी सैनिकांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:15+5:302021-07-03T04:06:15+5:30

नागपूर : माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२१ - २२ या वर्षाकरिता आरएमएफडी, एएफएफडीमधून ...

Ex-servicemen for financial assistance | आर्थिक मदतीसाठी माजी सैनिकांच्या

आर्थिक मदतीसाठी माजी सैनिकांच्या

Next

नागपूर : माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२१ - २२ या वर्षाकरिता आरएमएफडी, एएफएफडीमधून आर्थिक मदत मिळणार आहे. तरी याबाबतचे अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वय ६५ वर्षे पेन्शन नसलेल्या माजी सैनिकांसाठी चरितार्थ आर्थिक मदत २०२१-२२ करिता वार्षिक ४८ हजार रुपये याप्रमाणे मदत करण्यात येईल, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च, २०२२ पर्यंत आहे.

पहिल्या व दुसऱ्या पाल्यास शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रत्येकी १२ हजारप्रमाणे इयत्ता १ली ते ११वीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ अशी आहे. १०वी ते १२वीपर्यंत ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करता येतील, तर बी. ए., बी. कॉम., बी. एससी. या पदवी शिक्षणासाठी ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत अर्ज करता येतील.

मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत मिळण्यासाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य मिळेल. यात विवाहाची तारीख किंवा लग्नानंतर १८० दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. अंत्यविधीसाठी वार्षिक १२ हजार आर्थिक मदत करण्यात येईल. यात मृत्यू दिनांकानंतर ३६५ दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

अनाथ मुलांसाठी आर्थिक मदत वार्षिक १२ हजार यासाठी अर्ज करण्याची मुदत नाही. १०० टक्के मतिमंद, अपंग पाल्यासाठी आर्थिक मदत १२ हजार याप्रमाणे यातही मुदत नाही. वैद्यकीय मदतीसाठी ३० हजार ते १ लाख २५ हजार रुपयांच्या मदतीची तरतूद आहे. यात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन ६ महिन्यापर्यत अर्ज करता येईल. यासाठी संबंधीत व्यक्ती पेन्शनधारक नसावा.

Web Title: Ex-servicemen for financial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.