नागरिकांच्या सतर्कतेमुळे थांबले सिमेंट मार्गाचे खोदकाम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:11+5:302020-11-27T04:04:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे कारण देत चक्क प्रतापनगरातील सिमेंट मार्गच खोदण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

Excavation of cement road halted due to vigilance of citizens () | नागरिकांच्या सतर्कतेमुळे थांबले सिमेंट मार्गाचे खोदकाम ()

नागरिकांच्या सतर्कतेमुळे थांबले सिमेंट मार्गाचे खोदकाम ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे कारण देत चक्क प्रतापनगरातील सिमेंट मार्गच खोदण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या विरोधामुळे हे काम अर्ध्यातच थांबवावे लागले. आश्चर्याची बाब म्हणजे खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे यासंदर्भात कुठलेही परवानगीचे पत्र नव्हते.

प्रतापनगरातील मुख्य रस्त्यावर सुमारे २० वर्षांअगोदर सिमेंट मार्ग तयार करण्यात आला होता. या मार्गावर कुठलेही खोदकाम करायचे असेल तर त्यासंदर्भात मनपासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बुधवारी अचानक सकाळच्या सुमारास मणी ले-आऊटकडे जाणाऱ्या वळणावर खोदकाम करण्यास सुरुवात झाली. सतर्क नागरिकांनी यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला विचारणा केली असता पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदत असल्याचे उत्तर मिळाले. मात्र अशाप्रकारे आजपर्यंत कधीही सिमेंट रस्ता खोदण्यात आला नाही, मग आताच कसा काय असा प्रकार होत आहे, असा सवाल नागरिकांनी केला. प्रभागाचे नगरसेवक प्रमोद तभाने यांनीदेखील या खोदकामास विरोध केला व परवानगीचे पत्र दाखवायला सांगितले. जर खोदकाम थांबविले नाही तर पोलिसांत तक्रार करण्यात येईल, असे म्हटल्यावर काम थांबविण्यात आले.

याअगोदरदेखील झाले खोदकाम

दोन ते तीन आठवड्यांअगोदरच सिमेंट रस्त्याकडून गोपालनगरकडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावरदेखील असेच खोदकाम करण्यात आले. रातोरात हे काम करण्यात आले व थातूरमातूर सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र जो रस्ता इतकी वर्षे मजबूत होता त्यावर असे सिमेंटीकरण किती काळ टिकेल व मुळात हा रस्ता खोदण्याची आवश्यकता काय, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Excavation of cement road halted due to vigilance of citizens ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.