विद्यार्थ्यांनी सादर केले अभियांत्रिकीचे उत्कृष्ट मॉडेल
By Admin | Published: February 27, 2015 02:13 AM2015-02-27T02:13:32+5:302015-02-27T02:13:32+5:30
लोकमत युवा नेक्स्टच्या सहकार्याने प्रियदर्शनी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग, न्यू नंदनवनमध्ये ‘स्पिटजी २०१५’चे आयोजन करण्यात आले.
नागपूर : लोकमत युवा नेक्स्टच्या सहकार्याने प्रियदर्शनी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग, न्यू नंदनवनमध्ये ‘स्पिटजी २०१५’चे आयोजन करण्यात आले. यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मॉडेल लक्षवेधी ठरले आहेत.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मॉडेल आणि प्रोजेक्टच्या या भव्य स्पर्धेत राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ११०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांनी सिव्हिल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशन्स, आयटी, मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि अभियांत्रिकीच्या सिद्धांतावर एकापेक्षा एक उत्कृष्ट असे २२० मॉडेल सादर केले आहेत. ज्यात इमारत निर्मिती, कृषी, रस्ते आणि पुलांच्या (ब्रीज) मॉडेलचा समावेश आहे. दिवसभरात विद्यार्थ्यांनी आपल्या मॉडेलचे सादरीकरण केले. संबंधित विषयाच्या तज्ज्ञांनी मॉडेल तसेच प्रोजेक्टची पाहणी करून पुरस्कारासाठी निवड केली. सायंकाळी एका कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट मॉडेल आणि प्रोजेक्ट सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. ए.एम. शेंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून व्हीएनआयटीचे डॉ. एस.बी. वाकरे, प्रो. एम.जी.पठाण आणि प्रो. एम.डी. पिदुरकर उपस्थित होते. परीक्षकांची जबाबदारी डॉ. एस.पी. राऊत, चेतन पवार, एच.एस. बालपांडे, राजवर्धन सिंह, प्रो. व्ही.पी. बालपांडे. प्रो. यू.एच. मांडेकर आणि प्रो. जी.एच. दहोले यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)