उत्पादनातील घट होण्यामागे अत्याधिक लालसा कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:18+5:302021-07-08T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात जलवायू परिवर्तनामुळे विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात कापूस, सोयाबीन, चणा आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात जलवायू परिवर्तनामुळे विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात कापूस, सोयाबीन, चणा आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. भविष्यात याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच आलेल्या ‘आय इन्स्टिट्यूूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज’च्या सर्वेक्षण अहवालात याचा उल्लेख झाला आहे. जलवायू परिवर्तनासोबतच अत्याधिक उत्पादन घेण्याच्या लालसेपोटी उत्पादकता घटत आहे, अशी माहिती नीरीचे माजी मुख्य वैज्ञानिक तथा जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख डॉ. जय शंकर पाण्डेय यांनी ‘लोकमत’ला दिली.
डॉ. पाण्डेय म्हणाले, प्रत्येक वस्तूप्रमाणे मातीचीदेखील क्षमता असते. त्यानुसारच तिची उत्पादकता असते. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परिणामत: अधिक उत्पादनाऐवजी उत्पादकता घटत चालली आहे. विकासातील सातत्य (सस्टेनेबल डेव्हलपमेंट)साठी इंडस्ट्रियल, कमर्शियल, फॉरेस्ट, ॲग्रीकल्चर अँड रेसिडेन्सियल (आयसीएफएआर) ॲक्टिव्हिटीजच्या प्रमाणाचे पालन करणे आवश्यक आहे. हे योग्य पालन झाले तरच आम्हाला विकासातील सातत्य साधता येईल. यात थोडा जरी असमतोल झाला तर जेवणात मीठ, हळद, तेल, तिखट कमीअधिक झाल्यावर असमतोल होतो, तसाच यातही होईल.
ते म्हणाले, पूर्वी कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी काही काळासाठी जमीन पडीत ठेवली जायची. मात्र, आज असे होत नाही. एकापाठोपाठ एक उत्पन्न घेण्यावर भर असतो. यामुळे मातीच्या क्षमतेवर ताण येतो. त्याचा परिणाम उत्पादकता घटण्यात होतो.
...
प्रत्येक जिल्ह्यासाठी पर्यावरण आरोग्य कार्ड बनावे
डॉ. पाण्डेय म्हणाले, आयसीएफएआरचे प्रमाण प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे असते. यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे पर्यावरण आरोग्य कार्ड तयार केले जावे. त्यानुसारच संबंधित जिल्ह्यात उपक्रम राबविले जावे. याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित क्षेत्राशी जुळलेल्या प्रत्येक स्तरातील लोकांना सहभागी केले गेले तरच याचे सकारात्मक परिणाम दिसतील. ...
असा आहे अहवाल
इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीजचा ‘महाराष्ट्रातील कृषीविषयक जलवायू बदलाचे परिणाम’ असे शीर्षक असलेल्या अहवालात मागील ३० वर्षांतील (१९८९ ते २०१८) मधील आठवडानिहाय आकड्यांचे विश्लेषण करून विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत होणाऱ्या पुढील ३० वर्षांतील (२०२१ ते २०५०) संभाव्य पर्जन्यमान आणि उष्णतामानाच्या आकड्यांचा अंदाज लावण्यात आला आहे. यानुसार राज्यातील सोयाबीन, कापूस, गहू आणि चणा ही चार प्रमुख पिके प्रभावित होण्याचा अनुमान आहे.
...