दारू विक्रेत्याचा एक्साईज जवानावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:10 AM2021-04-10T01:10:34+5:302021-04-10T01:11:44+5:30

liquor dealer attacked on Excise officer पाठलाग करून दारू पकडणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या जवानावर एका गुंडाने दगडाने हल्ला करून जखमी केले.

Excise officer attacked by liquor dealer | दारू विक्रेत्याचा एक्साईज जवानावर हल्ला

दारू विक्रेत्याचा एक्साईज जवानावर हल्ला

Next
ठळक मुद्देकपाळावर मारला दगड - नंदनवनमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पाठलाग करून दारू पकडणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या जवानावर एका गुंडाने दगडाने हल्ला करून जखमी केले. शिरीष अविनाश देशमुख (वय ४३) असे जखमीचे नाव आहे. तर, सिद्धार्थ ऊर्फ मढ्या रामटेके (वय २२, रा. जुना बगडगंज) असे आरोपीचे नाव आहे.

एक्साईजच्या भरारी पथकात कार्यरत असलेला शिरीष त्यांच्या सहकाऱ्यांसह ७ एप्रिलला रात्री ७ च्या सुमारास गंगाबाई घाट चाैकातून हिवरीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर आरोपी सिद्धार्थ ऊर्फ मढ्या रामटेके हा दुचाकीवरून एक पोते घेऊन जाताना दिसला. संशय आल्यामुळे शिरीष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मढ्याचा पाठलाग केला. जुना बगडगंज परिसरात आरोपीला या पथकाने पकडले. तेथे अचानक बाजूचा दगड उचलून आरोपी रामटेकेने शिरीषच्या डोक्यावर दगड मारून त्यांना जखमी केले आणि पळून गेला. पोलिसांनी त्याच्या दुचाकीवर ठेवलेल्या पोत्यातून देशीदारूच्या ४८ बाटल्या जप्त केल्या. जखमी शिरीष यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी रामटेकेविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Excise officer attacked by liquor dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.