बसपाचे मोहम्मद जमाल यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:57 PM2019-04-09T23:57:36+5:302019-04-09T23:58:33+5:30

बहुजन समाज पार्टीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांच्या प्रचारार्थ नारी रोड येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयासमोरून प्रचार रॅली काढण्यात आली. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी केले.

Excited response to BSP's Mohammed Jamal's rally | बसपाचे मोहम्मद जमाल यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बसपाचे मोहम्मद जमाल यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे‘जयभीम का नारा गुंजेगा’च्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाज पार्टीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांच्या प्रचारार्थ नारी रोड येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयासमोरून प्रचार रॅली काढण्यात आली. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी केले.
रॅलीत बसपाचे महासचिव पृथ्वी शेंडे, प्रदेश सचिव प्रा. भाऊ गोंडाणे, नागोराव जयकर, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, शहर प्रभारी योगेश लांजेवार, शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, किशोर कैथेल, महिला नेत्या रंजना ढोरे, चंद्रशेखर कांबळे, आनंद सोमकुवर, मिलिंद गजभिये, प्रताप सूर्यवंशी, तपेश पाटील, मुकेश मेश्राम, सुरेखा डोंगरे, सुनंदा नितनवरे, नगरसेवक तसेच शहरातील जिल्हा, विधानसभा, सेक्टर पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीत बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी निळे झेंडे घेऊन मोहम्मद जमाल यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. बसपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निळे, हिरवे झेंडे घेऊन ‘जो बहुजन की बात करेगा, वो दिल्ली से राज करेगा’, ‘एससी, एसटी, ओबीसी, भारत के है मूल निवासी, ‘जयभीम का नारा गुंजेगा, भारत के कोने कोने मे’, व्होट हमारा राज तुम्हारा, नही चलेगा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. हत्ती या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून मोहम्मद जमाल यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. रॅली कपिलनगर, विनोबा भावेनगर, नागसेनवन, पंचशीलनगर, लष्करीबाग, इंदोरा, जरीपटका, गोरेवाडा, गिट्टीखदान, सेमिनरी हिल्स, फुटाळा, पांढराबोडी, धरमपेठ चौक, व्हेरायटी चौक, धंतोली, घाट रोड, जाटतरोडी, शताब्दी चौक, मानेवाडा, तुकडोजी चौक, मेडिकल, रेशीमबाग, महाल, गोळीबार चौक, कमाल चौक या मार्गाने काढण्यात आली. इंदोरा मैदानात रॅलीचा समारोप करण्यात आला.

Web Title: Excited response to BSP's Mohammed Jamal's rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.