Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:09 PM2019-09-25T20:09:37+5:302019-09-25T20:10:12+5:30

तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

Excitement among youth, increase in voters: Impact of public awareness | Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

Next
ठळक मुद्देप्रशासन व राजकीय पक्षांनीही राबविली विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील मतदार यादी मार्च २०१९ मध्ये जारी करण्यात आली होती. तर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने ऑगस्ट २०१९ पर्यंत नोेंदणी असलेल्या मतदारांची यादी जारी केली आहे. या दोन्ही मतदार यादीची तुलना केल्यास जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा निवडणुकीमध्ये ८२,०६ मतदार वाढले आहेत. मतदारांची संख्या वाढण्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदार संघ सर्वात पुढे आहे. कामठीतील मतदार संख्या ४,१७,२७७ वरून ४,३८,४१७ इतकी झाली आहे. याचप्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात ९,५७४, दक्षिण नागपूरमध्ये ६,०२८, पूर्व नागपुरात ६,६६२, मध्य नागपुरात ६,९२५, पश्चिम नागपुरात ६,५६६ आणि उत्तर नागपुरात ८,४८३ मतदार लोकसभा निवडणुकीनंतर वाढले आहेत.
७३,९३६ नवीन मतदार
जिल्ह्यात या कालावधीत १८ ते १९ वयोगटातील ७३,९३६ नवीन मतदारांनी नोंदणी केली. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत ही नवीन नोंदणी झाली. यादरम्यान ८,८३८ मतदारांचे नाव हटविण्यात आले. यापैकी ५,७०८ मतदार हे मृत झालेले आहेत, तर १४५३ मतदार हे दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित झालेले आहेत. ८७६ मतदारांची नावे दोन ठिकाणी आढळून आली.
तृतीयपंथी झाले कमी
एकीकडे एकूण मतदारांची संख्या उल्लेखनीय वाढली असली तरी तृतीयपंथीयांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते. मार्च २०१९ मध्ये १०९ मतदार तृतीयपंथी होते. आता ती संख्या १०० वर आली आहे. रामटेकमध्ये पूर्वी आठ तृतीयपंथी मतदार होते. आता एकही नाही. कामठी व पश्चिममध्ये प्रत्येकी एक मतदार कमी झाला. केवळ मध्य नागपुरात आठ तृतीयपंथी होते, ती वाढून ११ वर पोहोचली आहे. सर्वाधिक तृतीयपंथी मतदार उत्तर नागपुरात आहेत. येथे पूर्वीही तितकेच मतदार होते.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या

मतदार संघ              ऑगस्ट २०१९            मार्च २०१९           वाढ
---------------------------------------------------------------
काटोल                      २,७१,५१८             २,७०,७४०            ७७८
सावनेर                       ३,१०,५८१             ३,०३,०८१             ७,५००
हिंगणा                        ३,७५,९२४            ३,६८,७५५          ७१६९
उमरेड                       २,८४,४०३             २,८३,३३१            १०७२
कामठी                      ४,३८,४१७             ४,१७,२७७          २१,१४०
रामटेक                     २,७८,०६९             २,७७,८९०          १७९
दक्षिण-पश्चिम            ३,८३,३८७              ३,७३,८१३           ९५७४
दक्षिण नागपूर            ३,८१,७४७             ३,७५,७१९          ६०२८
पूर्व नागपूर                ३,७०,८८२              ३,६४,२२०           ६६६२
मध्य नागपूर              ३,२३,९५७              ३,१७,०३२           ६९२५
पश्चिम नागपूर            ३,६०,८१९               ३,५४,२५३           ६५६६
उत्तर नागपूर             ३,८३,६६३              ३,७५,१८०             ८४८३
-----------------------------------------------------------------
एकूण                    ४१,६३,३६७          ४०,८१,२९१        ८२,०७६

Web Title: Excitement among youth, increase in voters: Impact of public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.