रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याच्या सूचनेने खळबळ; बेवारस बॅगमध्ये आढळला गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 10:05 PM2022-11-26T22:05:28+5:302022-11-26T22:06:02+5:30

Nagpur News रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याची रेल्वे कंट्रोल रूमला आज दुपारी माहिती मिळाली आणि रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली.

Excitement over suggestion of bomb in train; Marijuana found in an abandoned bag | रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याच्या सूचनेने खळबळ; बेवारस बॅगमध्ये आढळला गांजा

रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याच्या सूचनेने खळबळ; बेवारस बॅगमध्ये आढळला गांजा

Next
ठळक मुद्देरेल्वे प्रशासन, प्रवाशांमध्ये काही वेळेसाठी गोंधळ

नरेश डोंगरे 

नागपूर : रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याची रेल्वे कंट्रोल रूमला आज दुपारी माहिती मिळाली आणि रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी संबंधित गाडीची कसून तपासणी केली असता बॉम्ब ऐवजी गांजा असलेली बेवारस बॅग आढळली.

ट्रेन नंबर १२८४३ पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवून असल्याची माहिती रेल्वे कंट्रोल रूमला आज मिळाली. त्यामुळे कंट्रोलने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस तसेच सुरक्षा दलाच्या जवानांना अलर्ट दिला. त्यानुसार, रेल्वेगाडीत तपासणी सुरू झाली. दरम्यान गाडी भंडारा स्थानकावर पोहचली. तेथे सुरक्षा जवानांना एस-७ कोचमध्ये काळ्या-लाल रंगाची एक बेवारस बॅग दिसली. तिची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये गांजा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. त्यानंतर रेल्वेगाडी नागपूर स्थानकावर आली. येथे रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी प्रत्येक कोचची कसून तपासणी केली. मात्र काहीही आढळले नाही.

Web Title: Excitement over suggestion of bomb in train; Marijuana found in an abandoned bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.