खळबळजनक! नागपूर विद्यापीठाच्या विभागप्रमुख ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 PM2021-08-23T16:27:53+5:302021-08-23T16:28:40+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (५५) यांनी सोमवारी पहाटे अपार्टमेंटच्या ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (५५) यांनी सोमवारी पहाटे मनीषनगर येथील जयंती मॅन्शन-७ या अपार्टमेंटच्या ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्या माजी कुलगुरु दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तनावात असल्याचे सांगितले जाते.
डॉ. प्रा. ज्योत्स्ना मेश्राम या जयताळ्याला राहतात. त्यांना एक मुलगा आहे. तो अमेरिकेत राहतो. त्या मुलाकडे गेल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच त्या परत आल्या. मनीषनगरातील जयंती मॅन्शन-७ मध्ये त्यांची मावशी राहते. रविवारी राखी असल्याने त्या मावशीकडे आल्या होत्या. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
पतीच्या मृत्यूपासून त्या माानसिक तणावात होत्या. तसेच त्या विभागप्रमुख असल्याने नॅकची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. नॅक कमिटी दौ?्यावर येणार होती. त्यामुळेही त्या तणावात असल्याचे सांगितले जाते.