अस्वच्छतेतून मुक्ती हीच खरी देशसेवा
By admin | Published: October 3, 2015 02:43 AM2015-10-03T02:43:38+5:302015-10-03T02:43:38+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न पाहिले होेते.
मनपा व भाजपचे स्वच्छता अभियान : उपस्थितांना दिली शपथ
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न पाहिले होेते. त्यांनी भारत मातेची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता केली.
परंतु आज भारतमातेला अस्वच्छेतून मुक्ती देणे हे आद्य कर्तव्य असून हीच खरी देशसेवा आहे, अशा आशयाची शपथ महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने संत्रामार्केट येथे शुक्रवारी उपस्थितांना दिली.
शुक्रवारी गांधी जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी महापालिका व भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, महापालिकेतील सभापती संदीप जोशी, गिरीश देशमुख, जयश्री वाडीभस्मे, गोपाल बोहरे, देवेंद्र मेहर, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, अप्पर आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, एअर मार्शल जगजितसिंग, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर,डॉ. प्रदीप दासरवार,सहायक आयुक्त सुभाष जयदेव.
झोनचे सहायक आयुुक्त आदींनी अभियानात सहभाग घेतला. महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये हे अभियान राबविण्यात आले. सकाळी ८ वाजता गोमती हॉटेल परिसरात अभियानाला प्रारंभ करण्यात आला. प्रवीण दटके, देवेंद्र मेहर , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, झोन सभापती शीतल घरत, चेतना टांक, प्रमोद पेंडके, अनिता वानखेडे, सुलोचना कावे आदी उपस्थित होते.
त्यानंतर संत्रामार्केट परिसरात अभियान राबविण्यात आले. येथे दटके यांच्यासह सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, सुनील अग्रवाल आदींनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. रेल्वे स्टेशनच्या मागील भागातील कचरा मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गोळा केला. चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत शास्त्री ले-आऊ ट स्वावलंबीनगर, मिडल रिंगरोड खामला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गिरीश देशमुख, संदीप जोशी, गोपल बोहरे, प्रकाश तोतवाणी, संजय बोंडे, किशोर वानखेडे आदी उपस्थित होते.
गांधीबाग झोन भागात ढीवरपुरा, जुनी मंगळवारी, मिशन शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. झोन सभापती प्रभा जगनाडे, राजेश घोडपागे, वंदना इंगोले, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम आदींनी सहभाग घेतला.हनुमाननगर झोन भागातील मेडिकल कॉलेजचा परिसर, सक्करदरा येथील महात्मा गांधी मार्केट, बुधवारी बाजार परिसरात अभियान राबविण्यात आले. राष्ट्रवादीचे गटनेते राजू नागुलवार, झोन सभापती सारिका नांदूरकर आदी उपस्थित होते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. आशीनगर झोन भागात कामठी रोड, गुरुव्दारा, अशोक नगर चौकात अभियान राबविण्यात आले.
आमदार डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
मंगळवारी झोन भागातील गोरेवाडा वस्ती परिसरात अभियान राबविण्यात आले. महापलिका व तिरपुडे समाज कार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. नगरसेविका मीना तिडके, साधना बरडे, संगीता गिऱ्हे, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे आदींनी सहभाग घेतलाअभियानात प्रामुख्याने कार्यालयांची स्वच्छता, परिसराची साफसफाई, उद्यान, दवाखाने, सार्वजनिक स्वच्छतागृह, सुलभ शौचालय, पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. (प्रतिनिधी)