राज्यातील जिम सुरू करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांचे व्यायाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:42 AM2020-08-19T11:42:11+5:302020-08-19T11:42:49+5:30
राज्यात सर्वत्र बंद असलेले जिम सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी सकाळी संविधान चौकात व्यायाम आंदोलन केले. डंबेल्स उचलून त्यांनी फिटनेससाठी जिम सुरू करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यात सर्वत्र बंद असलेले जिम सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी सकाळी संविधान चौकात व्यायाम आंदोलन केले. डंबेल्स उचलून त्यांनी फिटनेससाठी जिम सुरू करण्याची मागणी केली.
दुकानांत फिजिकल डिस्टंनसिंगचे उल्लंघन होत आहे. दुसरीकडे शॉपिंग मॉलही सुरू करण्यात आले तिथेही डिस्टंनसिंगचे पालन होत नाही. ही सद्यस्थिती आहे. जिम सुरू करण्याची मागणी शहरातील जिम असोसिएशन, बॉडी बिल्डर असोसिएशन आणि जिममधील प्रशिक्षकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. या मागणीला समर्थन दर्शवित राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापौरांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
शहरातील २२२ जिम समोर जिममध्ये वर्कआउट करणारे पाच जण सुरक्षित अंतर ठेवून निदर्शन करणार आहेत. या सर्वांचे प्रातिनिधिक निदर्शन संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला पाच बॉडी बिल्डरांसह महापौरांनी केले.