ललित कला विभागातील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन
By आनंद डेकाटे | Published: June 26, 2024 05:26 PM2024-06-26T17:26:18+5:302024-06-26T17:26:46+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला व छंद मंदिर विभागातील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांची मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे.
मुंबई येथील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी वार्षिक मान्सून चित्रप्रदर्शन आयोजित केली जाते. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या मान्सून चित्र प्रदर्शनीसाठी ललितकला व छंद मंदिर विभागाच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हा विद्यापीठासाठी एक आनंदाचा क्षण आहे. गिरीश फुलझेले, पूनम वट्टी, नेहा अवचित, सारीका चौधरी व नीता देब अशी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांना डॉ. स्नेहल लिमये, डॉ. सदानंद चौधरी तसेच नाना मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे
संपूर्ण भारतातून येणाऱ्या हजारो प्रवेशिकांमधून जहांगीर आर्ट गॅलरीच्या मान्सून चित्र प्रदर्शनीसाठी निवड केली जाते. या कठीण निवड प्रक्रियेतून निवडलेली पाचही विद्यार्थ्यांची चमू ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.