अपेक्षा सामान्यांच्या; अतिसामान्यांचे जगणे सोपे व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:54 AM2019-03-19T11:54:53+5:302019-03-19T11:55:18+5:30
समाजात हातावर आणणे आणि पानावर खाणे हा वर्ग मोठ्या संख्येत आहे. या वर्गाचे जगणे सोपे व्हावे असे मत लक्ष्मीनगर येथे थोबी व्यवसाय करणाऱ्या बबन कनोजिया यांनी मांडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: समाजात हातावर आणणे आणि पानावर खाणे हा वर्ग मोठ्या संख्येत आहे. या वर्गाचे जगणे सोपे व्हावे असे मत लक्ष्मीनगर येथे थोबी व्यवसाय करणाऱ्या बबन कनोजिया यांनी मांडले आहे. हा वर्ग कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, महागाई, नोकरी व्यवसायात असुरक्षितता यात दबलेला आहे. त्याला प्रगतीची विकासाची अपेक्षा असली तरी, त्याची मिळकत पोटापेक्षा जास्त नाही. त्यामुळे विकासाच्या प्रवाहात तो स्थिरावला आहे. शिक्षण महागल्यामुळे मुलांना उच्च शिक्षण तो देऊ शकत नाही. रस्त्यावरचा व्यवसाय असल्याने अतिक्रमणाची त्याला भीती असते. महागाईमुळे इतर गरजा तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अतिसामान्यांचे जगणे असहय्य झाले आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे येवो, त्यांच्याकडून अतिसामान्यांचे जगणे सोपे व्हावे हीच अपेक्षा आहे.