अपेक्षा सामान्यांच्या; छोट्या व्यवसायांना सुरक्षितता प्रदान करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:37 AM2019-03-18T10:37:58+5:302019-03-18T10:38:28+5:30

सरकारने छोट्या व्यवसायांना सुरक्षितता द्यावी असे मत सलून व्यावसायिक अजय आडोकर यांनी व्यक्त केली आहे.

The expectation of the common man; Provide security to small businesses | अपेक्षा सामान्यांच्या; छोट्या व्यवसायांना सुरक्षितता प्रदान करावी

अपेक्षा सामान्यांच्या; छोट्या व्यवसायांना सुरक्षितता प्रदान करावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सरकारने छोट्या व्यवसायांना सुरक्षितता द्यावी असे मत सलून व्यावसायिक अजय आडोकर यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. मोठ्या संख्येने उच्च शिक्षण घेऊन तरुण, तरुणी भविष्याचा वेध घेत आहे. तुलनेत शासनाच्या नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यांत्रिकीकरण आणि खासगीकरणामुळे मानवी श्रम कमी झाले आहे. त्यामुळे आजची बहुतांश युवा पिढी स्वत:चा रोजगार उभा करण्यासाठी पुढे येत आहे. छोट्यामोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून करिअरचा वेध घेत आहे. अशा तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला, रोजगाराला बळ देण्यासाठी सरकारने त्यांना अपेक्षित कर्जपुरवठा, सुरक्षितता प्रदान करणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये एका वयानंतर निवृत्ती आलेल्यांना जसे सरकारने पेन्शन देते तशीच पेन्शन योजना लहान व्यावसायिकांसाठी राबविणे आवश्यक आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, आमच्या सामान्यांसाठी काही सकारात्मक धोरणे राबविण्याची गरज आहे.

Web Title: The expectation of the common man; Provide security to small businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.