काेराेनाला हद्दपार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:55+5:302021-05-07T04:09:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : काेराेना संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : काेराेना संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, आराेग्य कर्मचारी व स्थानिक लाेकप्रतिनिधींनी एकत्रित लढा देऊन काेराेनाला हद्दपार करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी केले.
तालुक्यातील धानला येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात गुरुवारी (दि.६) रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक पार पडली. कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जि. प. सदस्य कैलास बरबटे, तालुका आरोग्य अधिकारी रूपेश नारनवरे, उपअभियंता दिनेश मुनेश्वर, सरपंच वनिता वैद्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा टिकले, ज्ञानेश्वर चौरे, सीताराम राठोड, हिराचंद वैरागडे, अशोक पत्रे, मालती पत्रे, पूजा निर्वाण आदी उपस्थित होते.
धानला आराेग्य केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले. या ठिकाणी लवकरच आवश्यक सेवा उपलब्ध करण्यात येतील. या आराेग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका प्राप्त हाेईपर्यंत धानला ग्रामपंचायत येथे असलेली रुग्णवाहिका येथे सेवा देणार असल्याचे तापेश्वर वैद्य यांनी सांगितले. रुग्णांना उत्कृष्ट आराेग्य सेवा देणारे हे केंद्र जिल्ह्यात एकमेव ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत येथील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी याेग्य पद्धतीने काम करावे, रुग्णांची हेळसांड हाेणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असेही वैद्य यांनी यावेळी सांगितले. जि. प. सदस्य कैलास बरबटे यांनी काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करावे, असे सांगितले.