लसीकरण व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानधनावर ५.३९ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:10 AM2021-09-23T04:10:51+5:302021-09-23T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर होणारा खर्च स्वत: उचलणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पुढील बैठकीत येणार आहे.
मनपाची पाच डेडीकेट कोविड रुग्णालये आहेत. एनयूएचएमअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची तरतूद नाही. याचा विचार करता लसीकरण मोहीम, कोविड रुग्णालयांसाठी आवश्यक कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करण्यासाठी ५.३९ कोटींची तरतूद करणार आहे. आरोग्य विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयातील १०० बेडसाठी ५८ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याला ७६ लाख रुपये, आयसोलेशनन येथील ३० बेडच्या कोविड रुग्णालयासाठी १७ लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर ५२७ कर्मचारी आहेत. त्यावरील १.४८ कोटींचा खर्च करण्याला मंजुरी दिली जाईल.