रक्तदान हा अनुभवच मनाला सुखावणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:35+5:302021-07-08T04:07:35+5:30
नागपूर : दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वत:हून ...
नागपूर : दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकाला ‘रिप्लेसमेंट’ची आवश्यकता भासणार नाही. आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभवच मनाला सुखावणारा आहे. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांनी येथे केले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीप्रित्यर्थ २ ते १५ जुलै दरम्यान ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही राज्यव्यापी रक्तसंकलन मोहीम मोठ्या स्तरावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी विद्यार्थी परिषदेचे प्रभारी अधिकारी डॉ. वैभव कारेमोरे, राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक डॉ. योगेश राठोड, मेडिकलच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते, डॉ. प्रवीण मेश्राम यांच्यासह महाविद्यालयाचे डॉ. सचिन खत्री, डॉ. शुभा हेगडे व डॉ. ज्योती वानखेडे आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन अधिष्ठाता डॉ. फडनाईक व डॉ. कारेमोरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी प्रतिनिधी पवन मोटघरे, कल्पक पीटर, मानसी अस्वानी व प्रतीक्षा काठवटे यांनी यशस्वी केले. शिबिरात विद्यार्थ्यांपासून ते वरिष्ठ डॉक्टर, कर्मचारी या शिवाय काही रुग्णांच्या नातेवाईकांनीही रक्तदान केले.