नागपुरात कापूस पिकावर देशभरातील तज्ज्ञांचे मंथन

By गणेश हुड | Published: April 5, 2024 04:56 PM2024-04-05T16:56:04+5:302024-04-05T16:56:38+5:30

नागपूर : जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाच्या ...

Experts from all over the country brainstorm on cotton crop in Nagpur! | नागपुरात कापूस पिकावर देशभरातील तज्ज्ञांचे मंथन

नागपुरात कापूस पिकावर देशभरातील तज्ज्ञांचे मंथन

नागपूर : जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाच्या  उत्पादन वाढ व्हावी. यासाठी नागपुरात अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या दोन दिवसीय वार्षिक आढावा बैठकीचे वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था (वनामती), आयोजन करण्यात आले असून देशभरातील तज्ज्ञांचे मंथन सुरू आहे.  शुक्रवारी या बैठकीचे उदघाटन करण्यात आले. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत देशभरातील २१अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पासह निमशासकीय, सहकारी, खाजगी तथा सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तथा प्रगतीशील शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.  बैठकीच्या उदघाटन प्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे  उप महानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा, सहाय्यक महनिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादवा, सहाय्यक महनिदेशक (व्यापारी पिके) डॉ. प्रसंता दाश, केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपुरचे निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद, कृषि वैज्ञानिक भरती बोर्ड, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष तथा अखिल भारतीय समन्वित कापुस संशोधन प्रकल्पाच्या कार्यक्रम निरीक्षण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबईचे निदेशक डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे,यांचे विशेष उपस्थितीसह केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ तथा अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. जी.टी बेहेरे, कृषी महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी डॉ. डी. के. यादवा, डॉ. प्रसंता दाश, डॉ. चारुदत्त मायी, डॉ. एस. के. शुक्ला, यांनी समायोचित मार्गदर्शन केले.डॉ. डॉ. विलास खर्चे यांनी स्वागतपर भाषण केले तर डॉ. गणेश बेहरे यांनी संशोधन उपलब्धीचे सादरीकरण केले. निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी देखील आपले विचार मांडले. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ कापूस डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतिसह यांत्रिकीकरण गरजेचे : डॉ. तिलकराज शर्मा

जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाला गंभीरतेने घेणे काळाची गरज असून कपाशीच्या अधिक उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतिसह यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे  उपमहानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांनी उदघाटनपर संबोधनात  केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित मार्गदर्शनात शर्मा  यांनी अतिशय सुस्पष्ठ आणि परखड मत प्रदर्शित करीत देशांतर्गत सध्याची पीक पद्धती आणि कृषि संशोधकांची भूमिका अधोरेखित केली. काळसुसंगत पीक वाण,  सेंद्रिय - एकात्मिक अन्नद्रव्य तथा कीड रोग व्यवस्थापन, बाजारात अधिक स्थान असणाऱ्या  तंत्रज्ञानाचे सर्वदूर प्रशिक्षणे आणि प्रात्यक्षिके, उत्पादन तंत्रज्ञानासह सेंद्रिय तथा रंगीत कापुस पिकासाठी विविध पद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन केले.  या दोन दिवसांच्या संमेलनातून देशांतर्गत शेती व्यवस्थेला सक्षम तंत्रज्ञान आणि शिफारशी देता येतील असा आशावाद  त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक प्रक्रिया उद्योगाची साखळी सर्वदूर कार्यान्वित होणे गरजेचे : कुलगुरू डॉ. शरद गडाख
तर सध्याच्या हवामान आणि बाजारपेठांच्या अस्थिर आणि स्पर्धेच्या परिस्थितीत शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्य करणाऱ्या संस्थांसह प्रशासकीय विभागांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी काळाची गरज ओळखून सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित होण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची मोट बांधण्याचे महत्वपूर्ण आवाहन शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांना केले. शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार राष्ट्रीय संस्थाच्या सहयोगातून बीटी कापून वाण उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत विदर्भाचा विचार करता कापूस प्रक्रिया उद्योगांचे जाळे अधिक घट्ट करण्याची गरज देखील त्यांनी अधोरेखित केली.

Web Title: Experts from all over the country brainstorm on cotton crop in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.