जिल्हाधिकाऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करा

By Admin | Published: February 9, 2017 02:48 AM2017-02-09T02:48:28+5:302017-02-09T02:48:28+5:30

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे

Explain the role of the collector | जिल्हाधिकाऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करा

जिल्हाधिकाऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करा

googlenewsNext

हायकोर्ट : शासन व निवडणूक आयोगाला मागितले उत्तर
नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी राज्य शासन व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला यावर १० फेब्रुवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे मौखिक निर्देश दिले.
न्यायालयाने शासन व निवडणूक आयोगाला गेल्या तारखेस नोटीस बजावली होती. त्यांना आज, बुधवारपर्यंत उत्तर सादर करायचे होते. परंतु, दोन्ही प्रतिवादींना उत्तर सादर करण्यात अपयश आले. त्यांनी पुन्हा दोन आठवडे वेळ वाढवून मागितला. त्यावरून न्यायालयाने प्रतिवादींना फटकारले व १० फेब्रुवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. अ‍ॅड. सतीश उके असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. कुर्वे यांनी नागपुरातील विविध शाळांमध्ये व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यामुळे नागपूर हा त्यांचा गृह जिल्हा ठरतो. ‘यूपीएससी’द्वारे निवड झाल्यानंतर त्यांना उत्तराखंड येथे नियुक्ती देण्यात आली होती. १७ डिसेंबर २०१४ रोजी ते पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले. २० मे २०१५ रोजी त्यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये कुर्वे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कुर्वे यांच्यावर विविध गंभीर आरोप आहेत. त्यांचा इतिहास पाहता निवडणुका पारदर्शी होणार नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Explain the role of the collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.