नागपुरात  प्रॉपर्टी डिलरकडून महिलेचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:05 PM2018-12-28T22:05:59+5:302018-12-28T22:07:26+5:30

विवाहितेवर (वय ३६) बलात्कार करून एका प्रॉपर्टी डिलरने तिला पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून तिला गर्भधारणा होताच आरोपीने तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आरोपी जितेंद्र राधेश्याम तिवारी (वय ३३) याच्याविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Exploit of woman by property dealer in Nagpur | नागपुरात  प्रॉपर्टी डिलरकडून महिलेचे शोषण

नागपुरात  प्रॉपर्टी डिलरकडून महिलेचे शोषण

Next
ठळक मुद्देगर्भधारणेनंतर वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न : बलात्काराची तक्रार : वाडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहितेवर (वय ३६) बलात्कार करून एका प्रॉपर्टी डिलरने तिला पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून तिला गर्भधारणा होताच आरोपीने तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आरोपी जितेंद्र राधेश्याम तिवारी (वय ३३) याच्याविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पीडित महिला वाडीला ज्या भागात राहते, त्या भागात आरोपीचे प्रॉपर्टी डिलिंगचे काम आहे. ओळखी असल्याने तो तिच्या घरी जायचा. १३ फेब्रुवारी २०१५ ला असाच तो तिच्या घरी गेला. महिलेचा पती यावेळी घरात नसल्याचे पाहून पिण्याचे पाणी मागितल्यानंतर आरोपी तिवारीने महिलेवर बलात्कार केला. हे कुणाला सांगितले तर तुझीच बदनामी होईल, असे सांगून त्याने नंतर तिला गप्प केले. महिला गप्प बसल्यानंतर आरोपी नेहमी तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. या अनैतिक प्रकाराची कुणकुण महिलेच्या पतीला लागल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी आरोपीने तिला पतीपासून फारकत घेण्यास सांगून स्वत: लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, महिलेने पतीपासून फारकत घेतली. यानंतर आरोपी तिच्यावर पत्नीसारखा हक्क दाखवू लागला.
दोनदा गर्भपात, तिसऱ्यांदा पुन्हा ...!
सततच्या शरीरसंबंधामुळे महिलेला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने आरोपी तिवारीमागे लग्नासाठी तगादा लावला. आरोपीने तिचा दोनदा गर्भपात करवून घेतला. तिला आता तिसºयांदा गर्भधारणा झाली. ४ डिसेंबरला आरोपीने नेहमीप्रमाणे तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा विषय काढताच त्याने नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. महिला ऐकत नसल्याचे पाहून त्याने तिला पुन्हा गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपातानंतर लग्न करू, असेही म्हटले. आरोपीने दोनदा अशाच प्रकारे तिचा गर्भपात करवून घेतल्यानंतर लग्नास टाळाटाळ केल्यामुळे महिलेने आरोपी तिवारीला यावेळी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे तिवारीने तिला धमकी दिली. परिणामी महिलेने या प्रकरणाची तक्रार वाडी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात आरोपी तिवारीविरुद्ध बलात्कार तसेच विश्वासघात केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Exploit of woman by property dealer in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.