आयकर आणि जीएसटी रिटर्नची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:38+5:302021-03-25T04:09:38+5:30

- एनव्हीसीसीची वित्तमंत्र्यांकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना ...

Extend the deadline for income tax and GST returns | आयकर आणि जीएसटी रिटर्नची मुदत वाढवा

आयकर आणि जीएसटी रिटर्नची मुदत वाढवा

Next

- एनव्हीसीसीची वित्तमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन पाठवून मार्चमध्ये आयकर व जीएसटी रिटर्न जमा करण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी या निवेदनात कोरोना महामारीचा संदर्भ दिला आहे. भारतासह जगभरात संक्रमणाच्या तांडवामुळे गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सरकारी धोरणे प्रभावित झाली आहेत. टप्प्याटप्प्यात आर्थिक व्यवहार सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी, महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा संक्रमणाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात टाळेबंदी लागू झाली आहे. दरम्यान, अकाऊंटसंबंधित कामासंदर्भात कमी क्षमतेने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मार्च हा महिना आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असण्यासोबतच आयकर व जीएसटीचे विविध नियम व रिटर्न भरण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदत आहे. कोरोना आणि टाळेबंदीमुळे या सर्व प्रक्रिया पार पाडण्यास समस्या निर्माण होत असल्याचे मेहाडिया यांनी म्हटले आहे.

याच निवेदनात चेंबरच्या प्रत्यक्ष कर समितीचे संयोजक संदीप जोतवानी यांनीही अनेक समस्या विशद केल्या आहेत. तिमाहीतील ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट, फेब्रुवारी २०२१ चे मासिक इलेक्ट्रॉनिक चालान, वर्ष २०२०-२१ चे जानेवारी-मार्च या तिमाहीचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत मार्च २०२१ आहे. ही मुदत पुढे वाढविणे गरजेचे आहे. वर्ष २०१९-२० चे आयकर ऑडिट व नॉन ऑडिटची प्रकरणे व रिव्हाईज रिटर्न फायलिंगच्या तारखांसोबतच विवाद ते विश्वास योजनेची मुदतही वाढविण्याची मागणी जोतवानी यांनी केली आहे.

अप्रत्यक्ष करसंबंधित विविध कर अनुपालन व रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविण्याची मागणी चेंबरच्या अप्रत्यक्ष कर समितीचे संयोजक रितेश मेहता यांनी केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या वर्तमान परिस्थिती व व्यापारीवर्गाला भोगाव्या लागत असलेल्या आर्थिक समस्यांचा विचार करीत आयकर व जीएसटीचे अनुपालन व रिटर्न भरण्याची मुदत वाढवून करदात्यांना सवलत देण्याची मागणी चेंबरचे सचिव रामअवतार तोतला यांनी केली आहे.

..........

Web Title: Extend the deadline for income tax and GST returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.