अनुपकुमार कुमरे यांना उत्तरासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:52+5:302021-02-24T04:08:52+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना आदेशाच्या अवमान प्रकरणात उत्तर ...

Extension to Anupkumar Kumre for reply | अनुपकुमार कुमरे यांना उत्तरासाठी मुदतवाढ

अनुपकुमार कुमरे यांना उत्तरासाठी मुदतवाढ

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना आदेशाच्या अवमान प्रकरणात उत्तर सादर करण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत वाढवून दिली व या प्रकरणावर शुक्रवारी पुढील सुनावणी निश्चित केली.

आरोपीला जामिनावर सोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे न्यायालयाने कुमरे यांच्याविरुद्ध स्वत:च अवमानना याचिका दाखल करून घेतली आहे. कुमरे यांनी न्यायालयात तीन प्रतिज्ञापत्रे सादर करून स्वत:ची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले नाही, असे नमूद करून न्यायालयाची माफीही मागितली होती. परंतु, त्यांच्या स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. गेल्या २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने फसवणूक प्रकरणामध्ये रविशंकर लोंधेकर यांना जामिनावर सोडण्याचा आदेश दिला होता. परंतु, कुमरे यांनी सायंकाळी ५ वाजतानंतर आरोपीला सोडता येत नसल्याचे सांगून आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयाचा दणका बसला आहे. उच्च न्यायालयातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Extension to Anupkumar Kumre for reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.