नागपुरात विस्तार अधिकाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:25 AM2020-09-03T00:25:47+5:302020-09-03T00:26:59+5:30

नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती सावनेरमध्ये कार्यरत तरुण विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारादरम्यान दुदैर्वी मृत्यू झाला.

Extension officer dies of covid in Nagpur | नागपुरात विस्तार अधिकाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू

नागपुरात विस्तार अधिकाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर :  नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती सावनेरमध्ये कार्यरत तरुण विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारादरम्यान दुदैर्वी मृत्यू झाला.  या मृत्यूमुळे जिल्हा परिषदेत शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी कोरोना विषाणूने बाधित झालेले आहेत, एका शिक्षिके पाठोपाठ विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यु झाल्यामुळे जिल्हा परिषद वतुर्ळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह मुख्यालयात ३० च्या वर अधिकारी / कर्मचारी बाधित झाले असल्याने जिल्हा परिषदेत ३० आॅगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.  सर्वात जास्त आघाडीवर काम करीत असलेले आरोग्य विभागातील कर्मचारी बाधित झाले आहे. अनेक विभागाने कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यासाठी आळीपाळीने बोलाविण्याचे आदेश काढले आहेत. सध्या जिल्हा परिषदेत अभ्यागतांना प्रवेश बंदी आहे. जिल्हा परिषदेच्या बैठका देखील व्हिडिओ कॉन्फरसिंगने घेण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत.

आरपीएफमधील चौघांना कोरोनाची लागण

आरपीएफ आयुक्त कार्यालयातील तीन आणि नागपूर आरपीएफ ठाण्यातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या चारही जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ३२ जणांची चाचणी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या २४ जवानांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारानंतर ते सर्वजण बरे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी विभागीय सुरक्षा आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, एक प्रशासकीय कर्मचारी आणि एक जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर नागपूर आरपीएफ ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Extension officer dies of covid in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.