राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:36 AM2018-06-23T00:36:31+5:302018-06-23T00:38:22+5:30

राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचे आदेश जारी केले.

The extension of the Principal Secretary of the State Legislature Secretariat, Dr. Anant Kalse | राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांना मुदतवाढ

राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांना मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे३० जूनला संपणार होता कार्यकाळ


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचे आदेश जारी केले. तब्बल ३६ वर्षांपासून विधिमंडळ सचिवालयात कार्यरत अनंत कळसे यांचा कार्यकाळ ३० जूनला संपणार होता. त्यांच्या निवृत्तीनंतर नवीन नियुक्तीबाबत सरकार दरबारी पेच निर्माण झाला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. यात प्रधान सचिवांची जबाबदारी महत्त्वाची असल्याने अधिवेशन तोंडावर ही जबाबदारी कोण सांभाळेल, असा प्रश्न सरकारला पडला. याशिवाय सचिव व दोन उपसचिवांची पदे रिक्त आहेत. तसेच चार उपसचिव न्यायालयात गेले असल्याने या जागादेखील रिक्त असल्याप्रमाणे स्थिती आहे या पार्श्वभूमीवर कळसे यांना मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जाते.

Web Title: The extension of the Principal Secretary of the State Legislature Secretariat, Dr. Anant Kalse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.