विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:33+5:302021-07-21T04:07:33+5:30
नागपूर : भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ...
नागपूर : भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज ५ ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत.
कोरोना संसर्गामुळे ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. अनेकांनी अद्यापदेखील अर्ज भरलेले नाही. शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यासाठी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे.
नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज तात्काळ महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. तसेच विभागातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवावे, असे आवाहन समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.