परदेशी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास १८ जूनपर्यत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:00+5:302021-06-17T04:07:00+5:30

नागपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून १८ जूनपर्यंत करण्यात ...

Extension till June 18 for submission of foreign scholarship applications | परदेशी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास १८ जूनपर्यत मुदतवाढ

परदेशी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास १८ जूनपर्यत मुदतवाढ

Next

नागपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून १८ जूनपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रॅंकमध्ये परदेशी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू.महाराष्ट्र डाट जीओव्ही डाट. इन या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा.व हा अर्ज एस.डब्ल्यु.एफ.एस. अप्लिकेशन्स.२१२२ ॲट जीमेल डाट. कॉम या मेलवर पाठवावा. त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, पुणे या पत्यावर पाठविण्यात यावी. या योजनेच्या अटी व शर्ती व लाभाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच अनुज्ञेय राहील, असे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे

Web Title: Extension till June 18 for submission of foreign scholarship applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.