दिवाळीसाठी एसटीच्या अतिरिक्त बसेस  : पुणे मार्गावर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:10 AM2019-10-18T00:10:26+5:302019-10-18T00:12:18+5:30

दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शिवशाही (आसनी) नियमित फेऱ्यांशिवाय जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Extra buses for Diwali: will run on the Pune route | दिवाळीसाठी एसटीच्या अतिरिक्त बसेस  : पुणे मार्गावर धावणार

दिवाळीसाठी एसटीच्या अतिरिक्त बसेस  : पुणे मार्गावर धावणार

Next
ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शिवशाही (आसनी) नियमित फेऱ्यांशिवाय जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-पूणे (शिवशाही आसनी) या मार्गावर गणेशपेठ बसस्थानकावरून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच पुणे ते नागपूर या मार्गावर पुणे येथील न्यू शिवाजीनगर वाकडेवाडी येथून २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, रात्री ८, ८.३०, २४ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, ८, ८.२०, ८.३० वाजता आणि २५ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, ७.४५, रात्री ८, ८.१०, ८.१५, ८.२०, ८.३०, ८.३५, २६ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, ८, ८.३० वाजता बसेस सोडण्यात येतील. तसेच नागपूर-माहुर, नागपूर-किनवट, नागपूर-आकोट, नागपूर-मोर्शी, सावनेर-अमरावती, रामटेक-परतवाडा, नागपूर-अमरावती, नागपूर-पुसद, काटोल-माहुर, काटोल-अकोला, सावनेर-माहुर, उमरेड-परतवाडा जाणाऱ्या आणि येणाऱ्या साध्या बसेस गणेशपेठ बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. शिवशाही बसमध्ये आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही कॅमेरा, उद्घोषणा प्रणाली असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. शिवशाही वातानुकूलित बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूरच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.

Web Title: Extra buses for Diwali: will run on the Pune route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.