नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:57 PM2018-08-16T23:57:40+5:302018-08-16T23:59:31+5:30

नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे.

In the eyes of the CCTV of the Nagpur railway station's Kanakopra | नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत

नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम’चा शुभारंभ : चेहरा ओळखणाऱ्या कॅमेऱ्याचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यातील इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत टेलिकॉम अ‍ॅन्ड सिग्नल विभागाचे मास्टर क्राफ्ट्समॅन नीरज उमाशंकर, अजनी रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक प्रकाश खैरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यात हाय डेफिनेशन, लॉंग रेंजचे २३५ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित झाले आहेत. आऊटरपासून रेल्वेस्थानकाच्या कानाकोपºयावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. यात रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म क्रमांक १ पासून ८ पर्यंतचा परिसर, फूट ओव्हरब्रीज, रिझर्व्हेशन कार्यालय, संत्रा मार्केटचा समावेश आहे. सीसीटीव्ही कॅमेरा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून यात संशयास्पद व्यक्तींचा तसेच गुन्हेगारांचा चेहरा ओळखणाºया कॅमेºयांचा समावेश आहे. मेसर्स व्हेंटेज इंटिग्रेटेड सिक्युरिटी सोल्युशन्स कंपनीने वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा जुरेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्हीच्या शुभारंभ प्रसंगी ‘एडीआरएम’ त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय दूरसंचार अभियंता मनोज कुमार सोनी, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता योगेश बारापात्रे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नामदेव रबडे उपस्थित होते.

 

Web Title: In the eyes of the CCTV of the Nagpur railway station's Kanakopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.