गुळणी चाचणीच्या संशाेधनावर आमने-सामने; ‘एम्स’च्या डॉक्टरांनी नवे काय केले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:38 AM2021-06-02T08:38:48+5:302021-06-02T08:39:42+5:30

Nagpur News सलाइन गार्गल (चूळ भरणे/गुळणी)द्वारे काेराेना संक्रमणाची तपासणी करण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संसाेधन संस्थे(नीरी)च्या संशाेधनावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्लीने घेतलेल्या आक्षेपामुळे नवीन वादाला ताेंड फुटले आहे.

Face-to-face on the research of the swallow test; What's new with AIIMS doctors? | गुळणी चाचणीच्या संशाेधनावर आमने-सामने; ‘एम्स’च्या डॉक्टरांनी नवे काय केले?

गुळणी चाचणीच्या संशाेधनावर आमने-सामने; ‘एम्स’च्या डॉक्टरांनी नवे काय केले?

googlenewsNext

 

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : सलाइन गार्गल (चूळ भरणे/गुळणी)द्वारे काेराेना संक्रमणाची तपासणी करण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संसाेधन संस्थे(नीरी)च्या संशाेधनावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्लीने घेतलेल्या आक्षेपामुळे नवीन वादाला ताेंड फुटले आहे. एम्सने थेट नीरीच्या वैज्ञानिकांवर आक्षेप घेण्याऐवजी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदे(आयसीएमआर)ला लक्ष्य केले आहे.

गुळणीद्वारे काेराेना संक्रमणाची तपासणी करण्याचे तंत्र विकसित करण्याची एम्सने सुरुवात केली हाेती, पण आयसीएमआरच्या दुर्लक्षामुळे आता त्या संशाेधनाचे श्रेय नागपूरच्या नीरीला दिले जात असल्याचा आराेप एम्स दिल्लीने केला आहे. मात्र एम्सच्या या दाव्यावर नीरीच्या वैज्ञानिकांनी तीव्र आक्षेप नाेंदविला आहे. या पद्धतीचे संशाेधन करणाऱ्या नीरीच्या वैज्ञानिकांच्या मते एम्सने सुरू केलेल्या कामात नवीन काही नव्हते. सलाइन गार्गलद्वारे विविध आजारांची तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही वर्षांपासून कार्य केले जात आहे आणि याबाबत विविध सायन्स जर्नलमध्ये प्रबंध प्रकाशितही झाले आहेत. याच आधारावर दिल्लीच्या एम्सने त्यांचे संशाेधन पुढे नेले, पण त्यांना हवे तसे यश मिळाले नसल्याचा दावा नीरीने केला आहे. याउलट नीरीने महिनाभरापूर्वी यावर काम सुरू केले. या पद्धतीत नीरीने विकसित केलेले ‘बफर साेल्यूशन’ महत्त्वाचा फॅक्टर असल्याचे नीरीच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले. यामुळेच तंत्र यशस्वी हाेऊ शकले व त्याचा उपयाेगही सुरू करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

काेराेना चाचणी करण्याची जुनी पद्धत

- घसा किंवा नाकावाटे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये गाेळा केले जाते. त्यात आरएनए (रायबाेस न्युक्लिक ॲसिड) एक्स्ट्रॅक्शन किटच्या मदतीने आरएनए वेगळा केला जाताे. त्यानंतर आरएनएची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. या प्रक्रियेला अधिक खर्च व वेळही लागताे.

- चाचणीची नवी पद्धत

नीरीने विकसित केलेल्या पद्धतीत आरएनए एक्स्ट्रॅक्शनची गरजच संपवून टाकली आहे. सलाइन गार्गलचे नमुने नीरीने विकसित केलेल्या बफर साेल्यूशनमध्ये मिसळून अर्धा तास रूम टेम्प्रेचरमध्ये ठेवल्यानंतर ९० अंश डिग्रीमध्ये तापविल्यास नमुन्यातील आरएनए वेगळा केला जाताे व त्यानंतर तीन तासांत रुग्णाची काेराेना चाचणीचा निकाल काढणे शक्य हाेते. यामुळे खर्च व वेळही वाचला आहे.

एम्सचा दावा

- सर्वात आधी एम्सने सलाइन गार्गलचे नमुने घेण्यास सुरुवात केली.

- ५० काेराेना संक्रमित रुग्णांचे नाेजल स्वॅब आणि गार्गलचे नमुने गाेळा करून आरटी-पीसीआर तपासणी केली गेली.

- दाेन्ही प्रकारांनी केल्या गेलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष एकसारखे हाेते.

- गेल्या वर्षी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये हे संशाेधन प्रकाशित झाले हाेते.

- आयसीएमआरने या संशाेधनाकडे लक्ष दिले नाही.

नीरीचा दावा

- सलाइन गार्गलद्वारे तपासणी करण्यावर यापूर्वीपासून संशाेधन चालले आहे आणि एम्सने नवीन काही केले नाही.

- नीरीने महिनाभरापूर्वी यावर कार्य सुरू केले. नीरीने विकसित केलेले ‘बफर साेल्यूशन’ हा या संशाेधनाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरला.

- काेराेना तपासणीमध्ये आरएनए वेगळा करणे हा महत्त्वाचा भाग आहे व त्यासाठी आरएनए एक्स्ट्रॅक्शन किटची गरज पडते. नीरीच्या बफर साेल्यूशनद्वारे ही गरज संपविली असून, गुळणीतील आरएनए सहज वेगळा करून कमी वेळात तपासणी करणे शक्य झाले आहे.

- नागपूर शहरामध्ये या पद्धतीचा उपयाेग करून तपासणीही सुरू करण्यात आली आहे.

- लवकरात लवकर लाेकांच्या उपयाेगात यावे म्हणून नीरीने पेटंट घेण्याकडे लक्ष दिले नाही.

- एम्सने संशाेधन केले तर वर्षभरापासून काम का सुरू केले नाही? केवळ क्रेडिट घेण्यासाठी खटाटाेप चालला आहे.

Web Title: Face-to-face on the research of the swallow test; What's new with AIIMS doctors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.