फेसबुक फ्रेण्डचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:05+5:302021-08-28T04:12:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नाच्या आमिषाने फेसबुक फ्रेण्डच्या वासनेला एक विद्यार्थिनी बळी पडली आहे. हा प्रकार मानकापूर ...

Facebook friend abuses student | फेसबुक फ्रेण्डचा विद्यार्थिनीवर अत्याचार

फेसबुक फ्रेण्डचा विद्यार्थिनीवर अत्याचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्नाच्या आमिषाने फेसबुक फ्रेण्डच्या वासनेला एक विद्यार्थिनी बळी पडली आहे. हा प्रकार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला असून, २९ वर्षीय आरोपी आदित्य संजय देशमुख यास पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित विद्यार्थिनी २० वर्षाची असून, तिची फेसबुकच्या माध्यमातून आदित्यशी मैत्री झाली. आदित्यने अश्लील मॅसेज पाठविल्याने विद्यार्थिनीने आदित्यला ब्लॉक केले होते. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार जुलै २०२० मध्ये आदित्यने इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेण्ड रिक्वेस्ट तिने स्वीकारल्यानंतर त्यांच्यात मैत्री जमली. डिसेंबर २०२० मध्ये आदित्यने तिला रात्री आपल्या घरी बोलावून तिच्यावर जोरजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी स्वत:चे बरेवाईट करेल, अशी धमकी देऊन आदित्यने विद्यार्थिनीला जानेवारी २०२१ मध्ये आपल्या घरी बोलावले. घरी आल्यावर त्याने तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगत व लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशा तऱ्हेने त्यांच्यात चार-पाच वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काहीच दिवसांपूर्वी आदित्य दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विद्यार्थिनीला मिळाली. याबाबत जाब विचारण्यासाठी तिने आदित्यशी संपर्क साधला असता, दोघांच्याही कुटुंबात जुना वाद असल्याने आपण लग्न करू शकत नसल्याचे आदित्यने विद्यार्थिनीला सांगितले. निराश झालेल्या विद्यार्थिनीने झालेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिल्यावर कुटुंबीयांच्या साथीने विद्यार्थिनीने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरी अत्याचार व धमकावण्याच्या प्रकरणाची नोंद करून आदित्यला अटक केली आहे.

.............

Web Title: Facebook friend abuses student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.