फेसबुक फ्रेंडशिपने केला विश्वासघात : १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:22 AM2019-05-23T00:22:19+5:302019-05-23T00:23:14+5:30

चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) झालेल्या एका युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुकवरून फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले; नंतर त्याची दगाबाजी लक्षात आल्याने मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी हर्षल पद्मगिरवार (वय २४, रा. संघ बिल्डिंगजवळ, महाल) याला अटक केली.

Facebook friends betrayed: 14-year-old girl raped | फेसबुक फ्रेंडशिपने केला विश्वासघात : १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

फेसबुक फ्रेंडशिपने केला विश्वासघात : १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देविद्यार्थिनीची तक्रार, सीएविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) झालेल्या एका युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुकवरून फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले; नंतर त्याची दगाबाजी लक्षात आल्याने मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी हर्षल पद्मगिरवार (वय २४, रा. संघ बिल्डिंगजवळ, महाल) याला अटक केली.
आरोपी हर्षल याने तिरपुडे कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने सीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, पीडित मुलगी मूळची कुही तालुक्यातील रहिवासी आहे. आई-वडील मुलीच्या शिक्षणासाठी नागपुरात स्थायिक झाले आहे. पीडित मुलगी नववीत तर तिची लहान बहीण पाचवीत शिकते. गेल्या वर्षी हर्षलने तिला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर सलग तिच्या पोस्टला तो फॉलो करीत होता. तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताच त्याने चॅटिंग सुरू केली. १ एप्रिल २०१८ पर्यंत दोघांची फेसबुकवरून चांगलीच गट्टी जमली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. ते तासन्तास संपर्कात राहू लागले. त्यांच्या भेटीगाठीही वाढल्या. त्याने एक दिवस संधी साधून तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. त्यानंतर तू १८ वर्षांची झाली की आपण लग्न करू, अशी थाप मारून तो तिच्यासोबत वारंवार इकडे-तिकडे शरीरसंबंध जोडू लागला. काही दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी फटकून वागणे सुरू केले. तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने तिने त्याला १८ मे रोजी विचारणा केली असता, त्याने तिला उलटसुलट बोलून ब्रेकअप झाल्याचे सांगितले.
अस्वस्थतेतून फुटली कोंडी
त्याने एकाएकी संबंध तोडल्याने आणि त्याचा फोन सारखा स्वीच ऑफ दिसत असल्याने मुलगी अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता आईच्या लक्षात आली. आईने तिला खोदून खोदून विचारले असता, तिने हर्षलने केलेली दगाबाजी सांगितली. आईने मुलीच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच मुलीला घेऊन हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून हर्षलला बलात्काराच्या आरोपात अटक केली.

 

Web Title: Facebook friends betrayed: 14-year-old girl raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.