फेसबुक फे्रण्डने केला बलात्कार
By admin | Published: July 18, 2015 02:52 AM2015-07-18T02:52:55+5:302015-07-18T02:52:55+5:30
फेसबुकवरून झालेल्या मैत्रीमुळे एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या ‘आरोपी मित्राने‘ तिला लग्नाचे आमिष दाखवून ..
मारहाण करून गर्भपात : आरोपी फरार
नागपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीमुळे एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या ‘आरोपी मित्राने‘ तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला अन् आता तिला वाऱ्यावर सोडले.
पीडित तरुणी २७ वर्षांची असून, ती प्रतापनगरात राहाते तर, आरोपी मोहनीश कृष्णदास कटरे (वय २७) गोंदिया जिल्ह्यातील देवू टोला (गोरेगाव) येथील रहिवासी आहे. तो मार्च २०१३ मध्ये तो नागपुरात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता. तो प्रतापनगरात भाड्याने राहात होता. पीडित तरुणी खासगी नोकरी करायची. फेसबुकवरून या दोघांची मैत्री झाली. ती बहरतच गेली. नंतर दोघे एकमेकांशी मोबाईलवरून निरंतर गप्पा मारू लागले. पुढे त्याने तिला प्रपोज केले. तिने होकार दिल्यानंतर हे दोघे वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. ती गर्भवती झाल्यानंतर त्याने तिला आपल्या गावाकडे नेऊन तिचा गर्भपात केला. नंतर पुन्हा मारहाण करून गर्भपात केला. यावेळी गर्भपात केल्यानंतर लग्न करू असे सांगणाऱ्या मोहनीशने नंतर तिच्याशी संबंध तोडले. तो टाळत असल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित तरुणीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. एपीआय मारुती मुंडे यांनी गुरुवारी रात्री मोहनीशविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)