कौशल्य विकास विद्यापीठाचा मार्ग मोकळा

By admin | Published: February 2, 2016 02:38 AM2016-02-02T02:38:54+5:302016-02-02T02:38:54+5:30

पूर्व नागपुरातील मौजा वाठोडा व तरोडी (खुर्द) येथे सिवरेज फार्मसाठी आरक्षित असलेल्या परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ...

Facilitate the skill development university | कौशल्य विकास विद्यापीठाचा मार्ग मोकळा

कौशल्य विकास विद्यापीठाचा मार्ग मोकळा

Next

पूर्व नागपुरात क्रीडा संकुलही होणार : २४४ एकर जागेवर साकारणार प्रकल्प : राज्य सरकारची अधिसूचना
नागपूर : पूर्व नागपुरातील मौजा वाठोडा व तरोडी (खुर्द) येथे सिवरेज फार्मसाठी आरक्षित असलेल्या परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना पडून असलेल्या २४४ एकर जागेवर क्रीडा संकुल,कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी आरक्षित जमीन वापरात बदल करण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. या प्रकल्पामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच नागपूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला आहे. त्यानुसार उपराजधानीत कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्र उभारण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रयत्नरत होते. या प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू होता. आमदार कृष्णा खोपडे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वाठोडा, भांडेवाडी व तरोडी येथील वापराविना पडून असलेली जागा सुचविली होती. यावर गडकरी यांनी प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून तातडीने शासनाला सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. खोपडे यांनी त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रस्तावाची माहिती दिली. त्यावर फडणवीस यांनी मुंबईत २७ जानेवारीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न महाराष्ट्र शासनाने सिवरेज फार्म एरियासाठी आरक्षित ठेवलेल्या जमिनीच्या वापरात बदल करून ही जमीन क्रीडा संकुल, कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्रासाठी आरक्षित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या जमिनीच्या वापरात बदल करण्याची अधिसूचना काढण्यात आली.
मौजा तरोडी (खुर्द) येथील खसरा क्र. ५२/१, २, ३ पै, ५३ पै, ५५, ६६/१, २,३, ५७, ५९/१, २ व ६० या जागेवर व मौजा वाठोडा येथील १७६/१-२, १७७, १७८/१, २ व ४, १८०/१, २ अशा १४१.५१ एक र जागेवर क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. ही जागा आरक्षित करण्याबाबतचा ठराव महापालिका सभागृहाने १९ मार्च २०१५ रोजी मंजूर करून क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. नगररचना विभागाच्या संचालकांनी यावर अभिप्राय देऊ न उपरोक्त जमिनीचा वापर बदलण्याची हमी दिल्याची माहिती खोपडे यांनी दिली. तसेच मौजा वाठोडा येथील खसरा क्र. ११४, ११५/१, २ व ३, ११६/१-२, १६९/१-२, १७०, १७१, १७४, १८०/१ व २ मौजा भांडेवाडी येथील खसरा क्र. १३७/१, १३७/२, १३८, १३९ व १६७/१ मधील एकूण १०२.५२ एकर जागा कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्रासाठी आरक्षित करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पूर्व नागपूरच्या विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे योगदान असल्याचे खोपडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

विकासाला गती मिळणार
पूर्व नागपुरात मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग आहे. त्यांच्या कौशल्याला वाव नसल्याने त्यांना इतरत्र भटकावे लागत होते, शिवाय त्यांना अल्प मजुरीवर काम करावे लागत होते. कौशल्य विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर त्यांच्यातील कौशल्याला मान मिळेल. तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होईल, असा विश्वास खोपडे यांनी व्यक्त केला.

Web Title: Facilitate the skill development university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.