असंघटित कामगारांना सुविधा द्या

By admin | Published: December 17, 2014 12:31 AM2014-12-17T00:31:24+5:302014-12-17T00:31:24+5:30

नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची दोन हजार पदे निर्माण करावी, खाजगी वाहन चालकांसाठी कायदा करून त्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर मंडळाची स्थापना करावी

Facilitate unorganized workers | असंघटित कामगारांना सुविधा द्या

असंघटित कामगारांना सुविधा द्या

Next

श्रमिक संघटना कृती समितीचा मोर्चा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची दोन हजार पदे निर्माण करावी, खाजगी वाहन चालकांसाठी कायदा करून त्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर मंडळाची स्थापना करावी आदी मागण्यांसाठी असंघटित व अस्थायी कामगारांसाठी श्रमिक संघटना कृती समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चात महापालिकेतील ऐवजदार कामगारांना सफाईचे साहित्य, सुरक्षेची सामग्री द्यावी, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांना सशक्त करावे, महापालिकेतील ठेका कामगारांना कायम करावे, विधानभवनातील कामगारांना १२ महिने काम द्यावे, आमदार निवास, रविभवन, विश्रामगृहातील रिक्त पदांवर त्यांना प्राधान्य द्यावे आदी मागण्या रेटून धरण्यात आल्या. सायंकाळी मोर्चातील शिष्टमंडळाने कामगार राज्यमंत्री पाटील यांना निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनातील मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)
नेतृत्व
जम्मू आनंद
मागण्या
खाजगी वाहनचालकांसाठी कायदा तयार करा.
महापालिकेत दोन हजार सफाई कामगारांची पदे निर्माण करा.
जिल्हा सुरक्षा मंडळांना सशक्त करा.
महापालिकेतील ठेका कामगारांना स्थायी करा.
विधानभवनातील कामगारांना १२ महिने काम द्या.
मोलकरणींना बीपीएल पेंशन आणि कर्मचारी राज्य विमा मंडळ अधिनियम लागू करा.

Web Title: Facilitate unorganized workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.