वाचनालयातील विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:04+5:302021-07-09T04:07:04+5:30
नागपूर : उत्तर नागपुरातील बाजीराव साखरे वाचनालय, डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय, पंचशील वाचनालय, सिद्धार्थ वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
नागपूर : उत्तर नागपुरातील बाजीराव साखरे वाचनालय, डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय, पंचशील वाचनालय, सिद्धार्थ वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश वाचनालय येथील स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना मागणीनुसार पुस्तके आणि इतर सोयी तात्काळ पुरविण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीत ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
वाचनालयात विद्यार्थांना अभ्यास करताना अनेक समस्यांना सामोरा जावे लागते. वाचनालयात पिण्याचे पाणी नाही, असामाजिक तत्त्वांचा वावर असतो, नादुरुस्त इलेक्ट्रिक फिटिंग, पार्किंगच्या जागी शेडची निर्मिती, टाईल्स फिटिंग, इमारतीमधून पाणी गळती, अस्वछ शौचालय, परिसरातील सौंदर्यीकरण, विद्यार्थांना वर्तमानपत्रांसह मासिके तात्काळ नि:शुल्क उपलब्ध करुन द्यावी असेही सांगितले. बैठकीला यावेळी मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
बाजीराव साखरे वाचनालयात सुविधा द्या
- लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयात विद्यार्थ्याना सुविधा पुरविण्यासह लहान मुलांकरिता आणि वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र अध्ययन कक्षाची निर्मिती करण्यासंबंधी आदेश दिले.
लोहिया वाचनालयाचा पुनर्विकास
- अशोक नगरस्थित डाॅ. राममनोहर लोहिया वाचनालय व श्रीमती उषाराणी महिला वाचनालयामध्ये विद्यार्थ्याना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून या वाचनालयाचा पुनर्विकास करण्यासंबधी संपूर्ण आराखडा तयार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.