महापौर निवडणुकीत काँग्रेसमध्ये गटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:09 AM2020-12-31T04:09:01+5:302020-12-31T04:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाच जानेवारीला होणाऱ्या महापौर - उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच जानेवारीला होणाऱ्या महापौर - उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. महापौरपदासाठी काँग्रेसचे मनोज गावंडे व रमेश पुणेकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या मंगला गवरे तर काँग्रेसच्या रश्मी धुर्वे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
महापौरपदासाठी भाजपचे दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे यांनी उमेदवारी दाखल केली. बसपातर्फे महापौरपदासाठी नरेंद्र वालदे तर उपमहापौरपदासाठी वैशाली नारनवरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
महापालिकेत १५१ सदस्यांपैकी भाजपचे १०८, काँग्रेसचे २९, बसपाचे १०, शिवसेना २ तर राष्ट्रवादी काँग्रेस १ व अपक्ष १ असे संख्याबळ आहे. संख्याबळाचा विचार करता भाजपचा महापौर निश्चित आहे. असे असतानाही काँग्रेसकडून महापौरपदासाठी मनोज गावडे व रमेश पुणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातून महापालिकेतील काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जानेवारीपर्यंत आहे. काँग्रेसमधील कुठल्या गटाचा उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतो याकडे लक्ष लागले आहे.