नागपुरातील युवा सेनेत गटबाजी : विक्रम राठोडला पद देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:57 PM2020-11-23T23:57:05+5:302020-11-24T00:00:11+5:30

Yuva Sena politics, nagpur news शिवसेनेच्या युवक आघाडीमध्ये असलेली गटबाजी सोमवारी चव्हाट्यावर आली. संघटनेतील गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक आयोजित केली. दरम्यान, वित्तीय संस्थेकडून वसुली प्रकरणात अडकलेल्या विक्रम राठोडला पुन्हा पदाधिकारी बनवण्यास विरोध दिसून आला.

Factionalism in Nagpur's Yuva Sena: Opposition to giving post to Vikram Rathore | नागपुरातील युवा सेनेत गटबाजी : विक्रम राठोडला पद देण्यास विरोध

नागपुरातील युवा सेनेत गटबाजी : विक्रम राठोडला पद देण्यास विरोध

Next
ठळक मुद्देवेगवेगळ्या ठिकाणी बैठक

लोकमतत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिवसेनेच्या युवक आघाडीमध्ये असलेली गटबाजी सोमवारी चव्हाट्यावर आली. संघटनेतील गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक आयोजित केली. दरम्यान, वित्तीय संस्थेकडून वसुली प्रकरणात अडकलेल्या विक्रम राठोडला पुन्हा पदाधिकारी बनवण्यास विरोध दिसून आला. या बैठकीत विस्तारक सर्व्हेश गुरव व नित्यानंद त्रिपाठी उपस्थित होते.

युवा सेनेचे कार्यकारी सदस्य रूपेश कदम हे सोमवारी नागपुरात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत दोन हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी मनपा निवडणुकीच्या तयारीचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमात लाच प्रकरणातील आरोपी विक्रम राठोड जिल्हा प्रमुख म्हणून उपस्थित होते. संदीप रियाल पटेल, धीरज फंदी, सलमान खान, बंटी धुर्वे आदी उपस्थित होते.

याचप्रकारे दुसरी एक बैठकही बोलावण्यात आली होती. यावेळी युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनची माहिती देण्यात आली. जिल्हा युवासेना पदाधिकारी हितेश यादव, शहर पदाधिकारी अक्षय मेश्राम, शशिधर तिवारी, शशिकांत ठाकरे, आशीष हाडगे, आकाश पांडे, ऋषीकेश जाधव, मंगश ठाकरे, अब्बास अली. सलमान खान, गौरव सावकर, गौरव गुप्ता आदी उपस्थित होते.

Web Title: Factionalism in Nagpur's Yuva Sena: Opposition to giving post to Vikram Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.