कवडस येथील चौकशीतील तथ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:06+5:302021-02-10T04:08:06+5:30
- मौजा कवडस येथील गट नं.२२५/१ आराजी ६ हेक्टर येथील खाणीची तपासणी आधी २९ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली ...
- मौजा कवडस येथील गट नं.२२५/१ आराजी ६ हेक्टर येथील खाणीची तपासणी आधी २९ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली होती. ही जमीन निहार जयंत खळतकर व संजय चंद्रशेखर इंगळे यांच्या मालकीची आहे.
- या जागेवर क्रशर मशीन व मिक्सिंग प्लांट चौकशी पथकाला दिसून आला. येथून काळा दगड मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी बिना परवानगीने ब्लास्टिंग करण्यात आल्याचे दिसून आले.
- या ठिकाणी १०६०.०७ ब्रास रेतीचा साठाही दिसून आला. रॉयल्टीबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे दाखविण्यात आली नाहीत.
- खोदकाम करण्यात आलेल्या जागेची लांबी १४७ मीटर, रुंदी ९० मीटर, तर खोली १२ मीटर आहे. येथून १,४७,९६० क्युुबिक मीटर म्हणजे ५२ हजार ब्रास काळ्या गिट्टीचे खोदकाम करण्यात आल्याचे नायब तहसीलदारांनी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केलेल्या अहवालात नमूद आहे.
- यानंतर मोजमापाची पुन:श्च खातरजमा करण्यासाठी ईटीसी मोजणीकरिता जिल्हा खनिकर्म विभागाची मदत घेण्यात आली. या मोजणी अहवालानुसार उपरोक्त ठिकाणाहून ५८,०७६.८५ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले.
पेंढरी येथील चौकशीतील तत्थ
- मौजा पेंढरी येथील गट क्रमांक ९२ येथील खदाणीची २९ जानेवारी २०२१ रोजी तपासणी करण्यात आली होती. ही जमीन सदाशिव गणपत उईके (रा. पेंढरी) यांच्या मालकीची आहे.
- येथे खोदकाम करण्यात आलेल्या जागेची लांबी १३१ मीटर, रुंदी १४२ मीटर, तर खोली ५ मीटर असून, एकूण ९३११० क्यूबिक मीटर म्हणजे ३२,८६५ ब्रास खोदकाम करण्यात आल्याचे नायब तहसीलदारांनी ८ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या चौकशी अहवाल नमूद आहे.
- या खोदकामाची ईटीसी मोजणी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाची मोजणी करण्यात आली. ईटीसी मोजणी अहवालानुसार उपरोक्त जागेवरून १७,३४८ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे नमूद आहे.