शैक्षणिक माहिती देणारे खरं प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:48 AM2018-06-10T01:48:33+5:302018-06-10T01:48:45+5:30

दहावी आणि बारावीनंतर कुठे आणि कोणते शिक्षण घ्यावे, यावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. प्रत्येक संस्था वा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शुल्क आणि अभ्यासक्रमांची माहिती घेणे हे कठीण काम आहे. पण लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील बहुतांश संस्था, कोचिंग क्लासेस आणि विद्यापीठांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने शैक्षणिक माहिती देणारे परिपूर्ण प्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Factual demonstrating the educational information | शैक्षणिक माहिती देणारे खरं प्रदर्शन

शैक्षणिक माहिती देणारे खरं प्रदर्शन

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांची प्रदर्शनाला भेट : आज अखेरचा दिवस


लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : दहावी आणि बारावीनंतर कुठे आणि कोणते शिक्षण घ्यावे, यावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. प्रत्येक संस्था वा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शुल्क आणि अभ्यासक्रमांची माहिती घेणे हे कठीण काम आहे. पण लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील बहुतांश संस्था, कोचिंग क्लासेस आणि विद्यापीठांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने शैक्षणिक माहिती देणारे परिपूर्ण प्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सहाव्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१८ चे तीन दिवसीय आयोजन शुक्रवार, ८ जूनपासून हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे सुरू आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांची माहिती जाणून घेण्याची संधी आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश आहे. १० जून प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.
विविध चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव आणि प्रवेश प्रक्रियांची माहिती विद्यार्र्थ्यांना देण्यात येत आहे. भाग्यशाली सोडतीत टॅब भेटस्वरुपात देण्यात येत आहे. प्रदर्शनात अकरावी सायन्स, कॉमर्स, आॅर्ट कॉलेज आणि सायन्स व कॉमर्सच्या कोचिंग क्लासेसची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय आणि देशविदेशातील नामांकित कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया आणि शुल्काची माहिती प्रदर्शनात देण्यात येत आहे. संस्थांसुद्धा विद्यार्थ्यांना करिअरवर योग्य मार्गदर्शन करीत आहेत. शिक्षण आणि करिअरचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे लोकमतचे ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शन सर्वोत्तम असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

प्रशिक डोंगरेने जिंकला टॅबलेट
लोकमत अ‍ॅस्पायर प्र्रदर्शनात येणाºया विद्यार्थ्यांसाठी भाग्यशाली सोडतीच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येत आहे. दुसºया दिवशी म्हाळगीनगर, नागपूर येथील प्रशिक दीपक डोंगरे हे विजेते ठरले आहेत.

गुणवंतांचा सत्कार
दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० पासून एक-एक तासाचे पाच चर्चासत्र होणार आहे.

आजचे चर्चासत्र
सकाळी ११.३० वाजता, विषय : करिअर इन टेक्निकल एज्युकेशन, वक्ते आशिष तायवाडे.
दुपारी १२.३० वाजता, बँकिंग आणि दहावीच्या परीक्षेत यश कसे मिळवाल, करिअर कॅम्पसचे सुशांत भगत.
सायंकाळी ४.३० वाजता, विषय : यशस्वी करिअरकरिता फाऊंडेशन कसे मजबूत कराल, वक्ते प्रियदर्शनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय शेंडे.
सायंकाळी ५.३० वाजता, विषय : ब्यूटी बिझनेसमध्ये करिअर, कुर्झ-द स्कूल आॅफ हेअर अ‍ॅण्ड ब्यूटी.

Web Title: Factual demonstrating the educational information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.