सिकलसेल रुग्णांची फरफट

By admin | Published: February 21, 2017 01:59 AM2017-02-21T01:59:01+5:302017-02-21T01:59:01+5:30

एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे अवहेलना या कात्रीत सिकलसेल रुग्ण सापडला आहे.

Faculty of Sickle Cells | सिकलसेल रुग्णांची फरफट

सिकलसेल रुग्णांची फरफट

Next

मेडिकलमध्ये चार वर्षांपासून गर्भजल परीक्षण बंद : डागा रुग्णालयात उपकरणाची प्रतीक्षा
नागपूर : एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे अवहेलना या कात्रीत सिकलसेल रुग्ण सापडला आहे. राज्यातील एकमेव मेडिकलमधील मोफत गर्भजल परीक्षण केंद्र चार वर्षांपासून बंद आहे. तर गरोदर मातांच्या गर्भातील बाळाचे परक्षण करण्यासाठी डागा स्मृती स्त्री रुग्णालयाला गर्भजल परीक्षण यंत्रणा केंद्राला अद्यापही उपकरण उपलब्ध झालेले नाही. परिणामी, सिकलसेलशी झुंजणाऱ्या गरोदर मातांची कुचंबणा सुरू आहे.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा आजार म्हणून सिकलसेल ओळखला जातो. सिकलसेलचे वाहक असलेल्या जोडप्यांमध्ये विवाह झाला तर जन्माला येणाऱ्या बाळाला सिकलसेल होण्याची जोखीम ९० टक्क्यांनी बळावते. अशा गरोदर मातांच्या गर्भातील बाळाचे परीक्षण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकृतीशास्त्र विभागात सात वर्षांपूर्वी उपकरण घेण्यात आले. या उपकरणावर आठवड्यातून २५-३० रुग्णांचे निदान व्हायचे. याच्या एका ‘किट’ला साधारण ९३ हजार रुपये खर्च यायचा. ‘एनआरएचएम’मधून हा निधी मिळायचा. परंतु उपकरण बंद पडल्याने रुग्णांना पदरमोड करून बाहेरून ही महागडी चाचणी करावी लागायची. गेल्या चार वर्षांपासून हे उपकरण नादुरुस्त अवस्थेत आहे. रुग्णालय प्रशासनाने नव्या उपकरणासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.(प्रतिनिधी)

डागात खोल्या बांधून तयार
डागा स्मृती स्त्री रुग्णालयाला गर्भजल परीक्षण यंत्रणा खरेदी करून देण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सरकारने ही तरतूद करून दिली. त्यासाठी मुंबई येथील आयसीएमआरच्या सहकार्याने हा निधी देण्यात येईल असे सांगण्यात आले. ही यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डागाला करण्यात आल्या. त्यानुसार डागात गेल्या वर्षभरासून खोल्या बांधून तयार आहेत. मात्र उपकरणे खरेदीचे अधिकार मुंबईला असल्याने तेथून फायलीच पुढे सरकेनाशा झाल्या आहेत. परिणामी, गर्भजल परीक्षण यंत्रणा बारगळल्याने गरोदर माता अडचणीत आल्या आहेत.

Web Title: Faculty of Sickle Cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.