पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण चिघळणार : फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:27 AM2020-10-09T00:27:43+5:302020-10-09T00:31:09+5:30

Devendra Fadnavis , Police assult case श्वानांसाठी सेवाभाव जपणाऱ्या महिला वकिलास पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याचे प्रकरण आता मंत्रालयात पोहचले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहून या प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Fadnavis' letter to CM; Assault lady advocate in police station | पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण चिघळणार : फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण चिघळणार : फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देलकडगंज पोलिसांची अडचण वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्वानांसाठी सेवाभाव जपणाऱ्या महिला वकिलास पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याचे प्रकरण आता मंत्रालयात पोहचले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहून या प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.
अ‍ॅड. अंकिता शाह यांना लकडगंज पोलीस ठाण्यात तेथील कर्मचारी मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अनिल गलगली (मुंबई) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा व्हिडिओही पाठवला आहे. त्यावरून फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून अ‍ॅड. शाह यांना मारहाण करणाºया लकडगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे पत्रही आज व्हायरल झाले आहे. त्यामुळे लकडगंज पोलिसांच्या अडचणी आता वाढणार आहेत.
विशेष म्हणजे, शाह यांनी पोलीस ठाण्यातून माहितीच्या अधिकारात २५ मार्चच्या घटनेचा व्हिडिओ मागून तो गेल्या आठवड्यात व्हायरल केला होता. तर, हा व्हिडिओचा आधीचा आणि नंतरचा भाग अ‍ॅड. शाह यांनी कापून केवळ मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याची बाजू लकडगंज पोलिसांनी मांडली होती.

Web Title: Fadnavis' letter to CM; Assault lady advocate in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.